Mumbai Local  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा, रेल्वेचा मोठा निर्णय

Good News For Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होते. ही बाब लक्षात घेता आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने हायकोर्टाला दिली.

Priya More

मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. लकवरच लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याबाबत माहिती दिली. येत्या दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये ही विशेष सेवा मिळणार आहे. लोकलमधील एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यामध्ये करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये जास्त गर्दी असली की चढता आणि उतरता येत नाही, त्याचसोबत त्यांना बसायला देखील जागा मिळत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबाबतच्या कार्यदेशासाठी रेल्वे प्रशासनाकडून विलंब होत असल्यामुळे हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश देखील दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी वकील के. पी. पी. नायर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला लवकरात लवकर कार्यादेश काढण्याचे आदेश दिले. यावेळी रेल्वे प्रशासनाने हायकार्टाला सांगितले की, रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सकारात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. येत्या दोन वर्षांत मध्य रेल्वेच्या १५५, तर पश्चिम रेल्वेच्या १०५ माल डब्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या डब्यामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.

या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला महत्वाचे आदेश देखील दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी असे आदेश हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले. या सुनावणीदरम्यान दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टाला दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT