Mumbai AC Local Train Latest Update SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या महिन्यात एसी लोकल धावणार, १२ फेऱ्या वाढणार

Mumbai AC Local Update : 25 डिसेंबर 2017 रोजी नाताळाच्या दिवशीच पहिली एसी मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यात आली होती.

Namdeo Kumbhar

मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. पश्चिम रेल्वे पुढील महिन्यात नवीन वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षाच्याआधी नाताळाच्या दिवशी या रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. मंगळवारी कांदिवली यार्ड येथे आलेली अद्ययावत एसी मुंबई लोकल ट्रेन सेवेत दाखल होण्यापूर्वी तिच्या सध्या अनिवार्य चाचण्या सुरू आहेत.

सात वर्षांआधी नाताळाच्या दिवशीच सुरू झाली होती पहिली एसी लोकल

25 डिसेंबर 2017 रोजी नाताळाच्या दिवशीच पहिली एसी मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यात आली होती. आता परत एकदा याच दिवशी एसी लोकल सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन करत आहे. तथापि, पश्चिम रेल्वे नेटवर्कमध्ये नवीन गाड्यांची भर पडल्याने निश्चितच सेवा सुधारेल, 10 ते 12 अतिरिक्त एसी लोकल ट्रिप प्रशासनाकडून नियोजित केल्या आहेत.

चेन्नई-आधारित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे निर्मित, या ट्रेनचे उद्दिष्ट प्रवाशांमधील अधिक AC सेवांची वाढती मागणी पूर्ण करणे आहे. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेकडे एसी लोकल गाड्यांची मागणी जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या 31 लाख रोजच्या प्रवासी संख्येपैकी 1.24 लाखांहून अधिक प्रवासी किंवा सुमारे 4 टक्के एसी लोकल ट्रेनचा पर्याय निवडतात. यावरून एसी लोकलची मागणी लक्षात येते.

मुंबईत चाकरमान्याच्या तुलनेत लोकल सेवा कमी आहे. त्याला अनेक कारणे आहेत, मात्र मुंबईकरांना कमी खर्चात प्रवासाची सेवा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा कायमच प्रयत्न असतो. प्रवाशांची मागणी लक्षात घेत एसी लोकलच्या नव्या रेल्वेचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे.

नव्या मुंबई लोकल ट्रेनमुळे एसी ट्रेनची मागणी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कमाईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या मुंबई लोकल ट्रेन सेवा रेल्वे विभागासाठी लक्षणीय कमाई करतात आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आता आठ एसी लोकल आहेत, त्यापैकी 7 आधीच सेवेत आहेत.

मुंबई लोकल ट्रेनच्या एकूण ताफ्यात 111 रेल्वे आहेत, त्यापैकी 95 चालू आहेत. यामध्ये 74 नॉन-एसी रेल्वे (12 कोच), 14 नॉन-एसी रेल्वे (15 डबे) आणि 7 एसी रेल्वेचा समावेश आहे. 

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT