मध्य रेल्वे मार्गाच्या कळवा आणि मुंब्रा या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पण लोकल आधीच्याच रेल्वे स्थानकांवरून भरू येत असल्यामुळे कळवा आणि मुंब्र्यामधील नागरिकांना लोकलमध्ये चढत येत नाही. जरी लोकलमध्ये चढता आले तरी देखील दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेकदा लोकलमधून पडून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वबाबी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वे प्रशासनाकडून कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर जलद लोकलला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी ५ ऑक्टोबरपासून होणार आहे.
कळवा आणि मुंब्रा या ठिकाणावरून मुंबई मध्ये नोकरी, शिक्षणासाठी येणाऱ्याचे प्रमाण जास्त आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांवर फक्त धिम्या लोकल थांबतात आणि त्या देखील आधीच फुल्ल झालेल्या असल्यामुळे या रेल्वे स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे वारंवार प्रवाशांकडून या दोन्ही रेल्वे स्थानकावर जलद लोकलला थांबे देण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेकडून श्रीकांत शिंदे आणि मध्य रेल्वे प्रशासनाला केली जात होती. अखेरी त्यंची मागणी मान्य करण्यात आली आहे.
आता कळवा आणि मुंब्रा या दोन्ही रेल्वे स्थानकांवर जलद लोकल थांबणार आहेत. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुसाट होईलच त्यासोबत त्यांना गर्दीचा देखील जास्त सामना करावा लागणार नाही. सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या दोन्ही रेल्वे स्थानकांवर ४ जलद लोकल थांबणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार शनिवार म्हणजे ५ ऑक्टोबरपासून या जलद लोकलला मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.
- सकाळी गर्दीच्या वेळी अंबरनाथवरून सीएसएमटीच्या दिशेने येणारी जलद लोकल कळवा येथे सकाळी ८:५६ वाजता थांबेल.
- आसनगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने येणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकावर ९.२३ वाजता थांबेल.
- संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटीवरून बदलापूरला जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकावर संध्याकाळी ७.२९ वाजता थांबेल.
- सीएसएमटीवरून टिटवाळ्याला जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकावर संध्याकाळी ७.४७ वाजता थांबेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.