Trans Harbour Line Disrupted Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल

Trans Harbour Line Disrupted: ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. तुर्भे रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दुरूस्तीचे काम सुरू आहे.

Priya More

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकादरम्यान गर्डर वाकला आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ९ आणि १० यावरून अद्याप एकही लोकल वाशी आणि पनवेलच्या दिशेने रवाना झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरील सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातून नवी मुंबई या ठिकाणी जाणारी रेल्वेसेवा गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. एमएमआरडीएच्या वतीने मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. परंतू हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्याचा फटका आता रेल्वे प्रवाशांना बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने काम सुरू आहे. थोड्याच वेळात लोकलसेवा सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की, 'ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर लावण्यासाठी एमएमआरडीएने ट्रान्स हार्बर लाईनवर मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. हे गर्डर लावताना ते वाकले गेले. त्यामुळे सकाळी ७:१० वाजल्यापासून ट्रान्स हार्बरवरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे.'

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे नवी मुंबईकडे कामासाठी जाणारे प्रवासी आणि ठाण्याकडे कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. ठाण्याकडून नवी मुंबईकडे जाणारे प्रवासी आता मध्य रेल्वे मार्गावरून कुर्ला रेल्वे स्थानकावर येऊन पुढे पनवेलला जात आहेत. तर ठाण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना कुर्ला मार्गे ठाण्यात जावे लागत आहे. यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

SCROLL FOR NEXT