Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच

Mumbai Local Train News : ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या दररोजच्या तुलनेमध्ये आज गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. वसई विरारमध्ये सायंकाळी ही अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत.
 Mumbai local railway
Mumbai local railwaySaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात ७ वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पश्चिम उपननगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रेमध्ये पाऊस पडल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली आहे. या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर १० ते १५ मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले. या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर १० ते १५ मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले.

ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या दररोजच्या तुलनेमध्ये आज गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. वसई विरारमध्ये सायंकाळी ही अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. काल रात्री ९ वाजल्यापासून वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. सकाळपासून ही पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या. अवकाळी पावसामुळे वसई विरारमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर वसईच्या बागायतीचंही नुकसान झालं आहे.

 Mumbai local railway
Pune News : पुण्यात एकीकडे मॉक ड्रील, तर दुसरीकडे ऑपरेशन 'बांगलादेशी'; ATSची जबरा स्ट्राईक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com