Mumbai Local Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांनी केला प्रवाशाचा चाकूने भोसकून खून

Mumbai Crime News : नवी मु्ंबईत नेरूळ स्टेशन दरम्यान प्रवाशाला ट्रेनमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच मध्य रेल्वेवर खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sandeep Gawade

नवी मु्ंबईत नेरूळ स्टेशन दरम्यान प्रवाशाला ट्रेनमधून ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच मध्य रेल्वेवर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या एका प्रवाशाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर खडवली रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांनी त्या दोन्ही तरुणांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या नशेखोर तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दत्तात्रय भोईर असं खून करण्यात आलेल्या प्रवाशाचं नाव आहे.

मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलमध्ये 27-28 एप्रिल च्या मध्यरात्री तीन ते चार नशेखोर तरुणांनी हैदोस घातला होता. या तरुणांनी लोकल डब्यात बसलेल्या प्रवाशांच्या मोबाईल आणि सोन्याच्या चेन खेचण्याचा प्रयत्न केला होता. जे प्रवासी त्यांना विरोध करत होते त्यांना ते पट्ट्याने तसेच चाकूचा धाक दाखवून मारहाण करत होते. यावेळी त्याच लोकलच्या डब्यात शहापूर जवळील साजिवली गावात राहणारे दत्तात्रय भोईर प्रवास करत होते, त्यांनी या नशेखोर तरुणांना विरोध केला. तेव्हा एका तरुणाने त्यांच्यावर चाकून वार केले आणि पट्ट्याने मारहाण केली. या घटनेत जखमी झालेले दत्तात्रय भोईर यांचा आज सकाळी सहा वाजता ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेनंतर खडवली रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांनी दोन तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या नशेखोर तरुणांविरोधात तक्रार दाखल केली होती.

दत्तात्रय भोईर 27 तारखेला उल्हासनगर येथील एका हळदीच्या कार्यक्रमाला आले होते ती अटपून त्यांनी कल्याणतून कसारा लोकल पकडली होती, आणि त्यावेळी वाशिंद आणि खडवली रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेने साजवली गावात शोककळा पसरली असून आता रात्री प्रवाशांनी लोकलमध्ये प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकललं

काल बुधवारीचं उत्तर प्रदेशातील ३२ वर्षांच्या तरुणाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून देण्यात आलं होतं. धावत्या ट्रेनमध्ये भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की चौघांनी त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं. तो ट्रॅकवर पडला. इतक्यात ट्रेनचं चाक त्याच्या हातावरून गेलं आणि त्याचा हात कायमचा निकामी झाला. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. सध्या हा तरुण सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जखमी तरुण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला होता आणि ही स्वप्नं एका क्षणी बेचिराख झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT