Lonavala Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: मुंबईतील २० वर्षांच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या, ४०० फूट खोल दरीत मारली उडी

Mumbai Law Student End life In Lonavala: लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून उडी मारत मुंबईतील तरुणीने आयुष्य संपवलं. ही तरुणी कायद्याचे शिक्षण घेत होती. ३६ तासांनंतर तिचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Priya More

Summary -

  • मुंबईतील २० वर्षीय विद्यार्थिनीची लोणावळ्यात आत्महत्या

  • लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून ४०० फूट खोल दरीत मारली उडी

  • ३६ तासांच्या शोध मोहिमेनंतर तिचा मृतदेह सापडला

  • या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

मुंबईतील तरुणीने पुण्याजवळील लोणावळ्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीने लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथून ४०० फूट खोल दरीत उडी मारत आयु्ष्य संपवलं. श्रेया नरेंद्र पाटी असं या तरुणीचे नाव होते. कौटुंबीक वादातून श्रेयाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. ३६ तासांच्या शोध मोहिमेनंतर श्रेयाचा मृतदेह सापडला. श्रेयाच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राहणारी श्रेया ३१ जानेवारीला ट्रेकिंगसाठी जाणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती सकाळी ११ वाजता लोणावळ्यात पोहचली. ती सर्वात आधी लोणावळ्यातील ड्यूक्स नोज येथे गेली. त्याठिकाणी थोडा वेळ थांबली. तिथून ती टायगर पॉइंटला रिक्षाने आली. त्याठिकाणी एका स्टॉलच्या मागे श्रेयाने बॅग ठेवली.

त्यानंतर टायगर पॉइंट येथील रेलिंगजवळ तुटलेल्या तारांच्या कुंपणाजवळ श्रेया गेली. याठिकाणावरून तिने थेट ४०० फूट खोल दरीत उडी मारली, असे स्थानिकांनी सांगितले. संध्याकाळ झाली तरी श्रेया घरी परत आली नाही त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी संपर्क केला तर तिचा फोन बंद लागत होता. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात आले.

दुकानदाराला श्रेयाची बॅग दिसली त्याने तिच्या बॅगेतील ओळखपत्रावर लिहिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला. त्याने श्रेयाच्या कुटुंबाला ती बेपत्ता असल्याचे सांगितले. तिचे कुटुंबीय रात्री उशिरा लोणावळ्यात आले. तपासातून असे दिसून आले की श्रेया एकटीच लोणावळ्यात आली होती. तिच्यासोबत तिचे कुणीच मित्र-मैत्रिणी नव्हते.

बॅगेत सापडलेल्या कपड्यांच्या आधारे श्वान पथकाने श्रेयाचा शोध सुरू केला. तर श्वास श्रेयाने ज्या ठिकाणावरून उडी मारली तिथे घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग बचाव पथकाच्या मदतीने तिचा शोध घेतला. ३६ तासांनंतर श्रेयाचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT