>> संजय गडदे
Mumbai Malad Tree Falls News: मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यापासून जुनाट झालेले वृक्ष कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालाड पूर्वेकडील दप्तरी रोड परिसरातील कासमबाग परिसरात एक झाड कोसळल्याची दुर्घटना केली.
या दुर्घटनेत दोन महिला आणि एक बालक जखमी झाले. जखमी झालेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून जखमींना जवळील जीवन ज्योती या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदाबाई अहिरे असं मृत महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालाड पूर्वेकडील एका खाजगी कंपाउंड मधील जुनाट वृक्षाच्या मोठ्या फांद्या बाहेर रस्त्यावर पडल्या. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असणारे एक लहान मुल जखमी झाले. (Latest Marathi News)
झाडाच्या फांदीचा बुंधा वयोवृद्ध महिलेच्या डोक्यावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाली मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला आहे. शिंदाबाई अहिरे (७० वर्षे) असं मृत महिलेचं नाव आहे.
रेखाबाई सोनवणे (46 वर्ष) आणि रुद्र सोनावणे (तीन वर्ष) अशी जखमी झालेल्यांची नावे असून कांदिवली येथील जीवन ज्योती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.