Domestic Worker Found Hanging in Antop Hill Apartment Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईतील High Five सोसायटीत मोलकरणीनं आयुष्य संपवलं; घरकाम करणाऱ्या घरातच आयुष्याचा दोर कापला

Domestic Worker Found Hanging in Antop Hill Apartment: अँटॉप हिल मोनोरेल स्टेशनजवळील अशियाना CHS, बी-14 येथे मंगळवारी सकाळी 27 वर्षीय गृहकाम करणारी युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळली.

Bhagyashree Kamble

मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. २७ वर्षीय गृहकाम करणाऱ्या युवतीनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. इमारतीत तिचा मृतदेह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी मूळची दार्जिलिंग येथील रहिवासी आहे. ती ज्या फ्लॅटमध्ये काम करत होती, त्याच ठिकाणी वास्तव्यास होती, अशी माहिती मिळत आहे. तिनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही धक्कादायक घटना अँटॉप हिल मोनोरेल स्टेशनजवळील आशियाना सीएचएस, बी - १४ या इमारतीतून उघडकीस आली. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास तरूणीचा मृतदेह आढळला. ती इमारतीतील एका फ्लॅटमध्ये घरकाम करायची. त्याच ठिकाणी ती राहत होती. तिनं ४ नोव्हेंबरला गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी युवतीच्या मृत्यूची नोंद केली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.

दरम्यान, तरूणीनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? तरूणीची आत्महत्या आहे की तिचा अन्य काही कारणामुळे मृत्यू झाला? याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि प्राथमिक चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT