Mumbai Measles  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! गोवरने घेतला ८ वा बळी; संशयित रुग्णांची संख्या संख्या २,६२३ वर

गोवंडीतील एका ६ महिन्याच्या मुलीचा भिवंडी ठाणे येथे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ झाला आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गोवरचे रुग्ण वाढू लागल्यामुळे मुंबईकरांच्या (Mumbai) चिंतेत भर पडत आहे. आतापर्यंत गोवरच्या रुग्णांची संख्या एकूण १६९ वर पोहचली आहे. तर तब्बल २ हजार ६२३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवंडीतील एका ६ महिन्याच्या मुलीचा भिवंडी ठाणे येथे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८ झाला आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १०५ रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

गोवरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. मुंबईत २१ लाख ५१ हजार २४ घरांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यापैकी नुसत्या गोवंडीत १ लाख ६१ हजार ७३७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २६२३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १२ हजार ८७० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. २६ ऑक्टोबर पासून मुंबईत ७ मृत्यू झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात ४, राजावाडी २, आणि १ घरी मृत्यू झाला होता.

गोवंडी येथील सकिना अन्सारी या ६ महिन्याच्या मुलीचा १३ नोव्हेंबरला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरला तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीला तीच्या पालकांनी भिवंडी ठाणे येथे नेले होते. त्यांनी याबाबतची माहिती दिली नव्हती. या मुलीच्या लसिकरणाबाबतही माहिती उपलब्ध झालेली नाही. यामुळे मृतांची संख्या ८ झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT