Mumbai Lakes Water Level News in Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Water Level In Mumbai Lakes: मुंबईकरांची पाण्याची चिंता जवळपास मिटली, सातही जलाशयातील पाणीसाठा ८३.१७ टक्क्यांवर

Satish Kengar

Water Level In Mumbai Lakes Marathi News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. असं असलं तरी मुंबईत शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता ८३.१७ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणी पातळी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांची पातळी खालीच आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव २७ जुलै रोजी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला, असे नागरी संस्थेने सांगितले. यापूर्वी २० जुलै रोजी शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहत होता.

मुंबई शहराला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा या जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. नागरी संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, तानसा येथील पाण्याची पातळी ९८.८५ टक्के आहे. मोडक-सागर येथे ९८.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

मध्य वैतरणा ९६.३६ टक्के, उर्ध्व वैतरणा ६९.८३ टक्के, भातसा ७७.११ टक्के, विहार १०० टक्के आणि तुळशीमध्ये ९९.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

सोमवारसाठी हवामान विभागाने मुंबईसाठी ग्रीन अलर्ट जारी केला असून, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंगळवारी सांगितले की, "आज मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसाच्या शक्यतेसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT