Chhatrapati Sambhajinagar News: श्वानप्रेमींनो सावधान! कुत्रा असेल तर परवाना घ्या, नाही तर होणार कारवाई...

श्वानप्रेमींनो सावधान! कुत्रा असेल तर परवाना घ्या, नाही तर होणार कारवाई...
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSAAM TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar News: श्वान प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही तुमच्या घरात कुत्रा पळत असाल, तर आता तुम्हाला त्यासाठी परवाना घेणं बंधनकारक आहे. असं न केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व श्वान मालकांना लावण्यात आलं आहे की, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, अधिनियम १९४९ चे कलम १२७ (२), (क) ४५७, (१३) अन्वये महानगरपालिका हद्दत पाळीव श्वान बाळगण्यासाठी श्वान परवाना हस्तगत करणे बंधनकारक आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
MNS on Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा तगडा 'प्लान'; राज ठाकरेंच्या ठाण्यातील बैठकीत काय ठरलं?

सर्व संबधीतांनी तात्काळ महानगरपालिका पशुचिकीत्सालय बायजीपुरा येथुन ( सुट्टीचे दिवस सोडुन) श्वान परवानासाठी लागणारे कागदपत्रे सादर करून नवीन श्वान परवाना व नुतनीकरण करून श्वान परवाना हस्तगत करावा, असं पालिकेने सांगितलं आहे.

तसेच पाळीव श्वान महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय अनाधिकृत पाळले असे गृहीत धरून विषेश मोहिमे अंतर्गत पाळीव श्वान नियम (११) अन्वये जप्त करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar News
Devendra Fadnavis Speech : 'हो, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आमचं लक्ष, पण...' फडणवीसांच्या वक्तव्याने CM शिंदे आणि अजितदादांना हसू आवरलं नाही

श्वान परवाना साठी लागणारे आवश्यक बाबी

श्वान परवाना नमुना अर्ज, पाळीव प्राण्यांचे दोन रंगीत फोटो (साईझ ५x७ से.मी),श्वान दंशक प्रतिबंधक रेबीज लस प्रमाणपत्र,श्वान परवाना फी रु.७५०/- ,श्वान परवाना नुतनीकरण फी(०१ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२३ पर्यंत ) रु ५००/- (०१ जून २०२३ नंतर ७५०/-)

श्वान परवाना मिळण्याचे ठिकाण

म.न.पा.पशु चिकित्सालय बायजीपुरा. वेळ -(सुट्टीचे दिवस सोडून) सकाळी ०८.०० ते ०१.०० व दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजे पर्यंत.

अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१६६४५१४ व दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३०१३५४. डॉग युनिट, बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन प्र. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com