Mumbai Minor Girl Molestation Case Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: बदलापूरची पुनरावृत्ती, मुंबईतील खारमध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Mumbai Minor Girl Molestation Case: खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्‍याकडून विनयभंग करण्यात आलाय. पोलिसांनी सव्वीस वर्षे आरोपीस अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, साम प्रतिनिधी

Mumbai crime News: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार (Badlapur School Minor Students Molestation Case) प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या खार दांडा परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग (Crime News) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई-वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत (pocso act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा आहे. खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खार दांडा परिसरात राहत असून ते जेवण बनवण्याचे काम करतो. त्यांच्या एक मुलगी बारा वर्षे वयाची व दुसरी सहा वर्षे वयाची आहे. त्यांच्या दोन घरे सोडून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने काल सहा वर्षीय मुलीला जीभ दाखवून घरात जबरदस्तीने घुसून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. घरात असणाऱ्या मुलीच्या आजीने आरडा ओरड केल्यानंतर आरोपीने त्यांना धमकावले. यासंदर्भात मुलींनी आपल्या आई-वडिलांना फोन करून माहिती दिली.

यानंतर मुलीचे आई-वडील कामावरून घरी आल्यानंतर मुलीचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बारा वर्षे मुलीने देखील मागील शनिवारी शेजारी व्यक्तीने घराच्या खिडकीतून डोकवत इशारे केल्याचं सांगितले. त्यानंतर मुलींच्या आई वडिलांनी तात्काळ खार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच खार पोलिसांनी तात्काळ अमन सिंग या 26 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT