Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Political Earthquake in Maharashtra: नाशिक पुण्यानंतर आता थेट साताऱ्यालाही हनी ट्रॅपचा विळखा पडल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय... त्यात 2 माजी मंत्री अडकल्याचा दावा केलाय.
Eknath Khadse reveals shocking details of Satara honey trap scandal involving ex-ministers.
Eknath Khadse reveals shocking details of Satara honey trap scandal involving ex-ministers.Saam Tv
Published On

नाशिक, ठाणे, मुंबईच नाही तर सातारा जिल्ह्याही हनीट्रॅपचं केंद्र बनलंय. इतकंच नाही तर 2 माजी मंत्री आणि एका मंत्र्याच्या मुलगा हनी ट्रॅपच्या विळख्यात सापडल्याचा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केलाय. हे प्रकरण बाहेर काढण्याचा इशाराच खडसेंनी दिलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलंय....

गेल्या काही दिवसांपासून खडसेंनी हनीट्रॅपचं प्रकरण लावुन धरलं आहे. खासदार संजय राऊतांनीही यापूर्वीच महायुतीचे मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा केलाय. नाशिकच्या हनी ट्रॅपवरुन आमदार जितेंद्र आव्हाडांनी पावसाळी अधिवेशनात चर्चा छेडली आणि राज्यात एकच खळबळ उडाली.. तर नाना पटोलेंनी पेन ड्राईव्ह दाखवत या प्रकरणात तब्बल 72 उच्च पदस्थ अधिकारी आणि आजी-माजी मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे हनी ट्रॅपचे धागेदोरे नाशिक, ठाणे, पुण्यापर्यंतच नाही मंत्रालयापर्यंत पोहचल्याची चर्चा आहे... तर जळगावच्या प्रफुल्ल लोढाने थेट मंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेत खळबळ उडवून दिलीय.

हाय प्रोफाईल लोक हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र साताऱ्यातील ते 2 माजी मंत्री कोण? आणि कोणत्या मंत्र्याचा मुलगा या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे? याची चौकशी होणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे. खडसेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं वक्तव्य केलं होतं...त्यामुळे खरंच खडसे आता महायुतीविरोधात शस्त्र म्हणून सीडी काढणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com