Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Amravati Accident : भारतीय जनता पक्षाचे आमदार केवलराम काळे यांच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये दुर्घटना घडली आहे. शाळेची पाण्याची टाकी कोसळून एका १४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Amravati Accident
Amravati Accidentsaam tv
Published On
  • अमरावतीच्या आदिवासी आश्रम शाळेतील पाण्याची टाकी कोसळली.

  • या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी.

  • ही आश्रम भाजपचे आमदार केवलराम काळे यांची असल्याची माहिती समोर

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. अमरावतीच्या एका आदिवासी आश्रम शाळेतील पाण्याची टाकी कोसळली. या अपघातामध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील नागापूर गावात वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रम शाळेची पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडली. या चार विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. यातील एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Amravati Accident
Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

आदिवासी आश्रमशाळेची पाण्याची टाकी कोसळल्यानंतर जखमी विद्यार्थिनींना अचलपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या अपघातात एका विद्यार्थिनीचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव सुमरती सोमा जामुनकर असे आहे. ही आश्रम शाळा भाजपचे आमदार केवलराम काळे यांची आहे.

Amravati Accident
Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

भारतीय जनता पार्टीचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांच्या अमरावतीच्या आदिवासी आश्रमशाळेत दुर्घटना घडली. शाळेची पाण्याची टाकी कोसळून एका १४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकारामुळे आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे म्हटले जात आहे.

Amravati Accident
Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com