Mumbai Crime x
मुंबई/पुणे

Mumbai : हायप्रोफाइल सोसायटीत 'काळेकांड'; सेक्रेटरीनं मर्यादा ओलांडल्या, महिलेला तसले मेसेज पाठवायचा, एकदा नव्हे तर दोनदा...

Mumbai Crime : कांदिवलीमधील एका प्रतिष्ठित हाउसिंग सोसायटीच्या सेक्रेटरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीमधील महिलांना आक्षेपार्ह मेसेज केल्याचा त्याच्यावर आरोप होत आहे.

Ganesh Kavade, Yash Shirke

  • कांदिवलीमधील प्रतिष्ठित सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हा दाखल.

  • महिलेला आक्षेपार्ह ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवल्याचा आरोप

  • महिलेच्या तक्रारीनंतर सेक्रेटरीच्या विरोधात कारवाईचा बडगा

Mumbai Crime News : मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवलीच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीमधील सदस्याच्या पत्नीला अश्लील, आक्षेपार्ह मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलवर पाठवल्याचा आरोप सेक्रेटरीवर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलिसांनी एका प्रतिष्ठित हाउसिंग सोसायटीच्या सेक्रेटरीच्या विरुद्ध एका सहकारी सदस्य आणि त्यांच्या पत्नीला लक्ष्य करून अश्लील आणि बदनामीकारक ईमेल आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, १० ऑक्टोबर रोजी सेक्रेटरीने सोसायटीच्या अधिकृत ईमेल आयडीवरून १६ समिती सदस्य आणि एका स्वतंत्र संचालकाला अश्लील आणि अपशब्दयुक्त ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये तक्रारदाराच्या पत्नीबाबत अश्लील टिप्पण्या आणि इतर सदस्यांबाबत अपमानजनक टिप्पण्या होत्या.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी गेल्या तीन वर्षांपासून सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी जवळपास ४०० रहिवाशांचा समावेश असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही आक्षेपार्ह मेसेज पोस्ट केले. तक्रारदाराने पुढे दावा केला की, २०२३ मध्ये वर्मा यांच्याविरुद्ध एका अन्य महिला सदस्याने अयोग्य वर्तनाची तक्रार केली होती.

महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर, समतानगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली अश्लीलता, बदनामी आणि इलेक्ट्रॉनिक संवादाचा दुरुपयोग यासाठी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, पोलिस आरोपीने प्रसारित केलेल्या ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या सामग्रीची पडताळणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT