Dixit Solanki Saam TV Marathi
मुंबई/पुणे

महिनाभरापूर्वी आईचे छत्र हरपले, आता इराण-इस्रायल युद्धात मुलाचाही मृत्यू; मुंबईतील सोळंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mumbai merchant navy sailor killed in drone attack near Oman : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमान किनारपट्टीजवळ ड्रोन हल्ल्यात मुंबईतील २५ वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Indian crew member dies in Iran-Israel conflict tanker attack : अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवलीतील २५ वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ इराणकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे एका भारतीय कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिनाभरापूर्वीच दीक्षित यांच्या आईचे निधन झाले होते. त्या दुखातून सावरण्याआधीच सोळंकी कुटुंबावर आणखी एक दुखाचा डोंगर कोसळला. (Indian seafarer killed during Iran Israel maritime conflict)

दीक्षित सोळंकी हा मूळचा दीवमधील भावसारवाडा येथील रहिवासी होता. त्याचे वडील अमृतलाल सोळंकी यांचा मासेमारीचा व्यवसाय असून, घरातील सर्वात लहान मुलगा असलेल्या दीक्षितने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मर्चंट नेव्हीमध्ये करिअर निवडले होते.अवघ्या महिनाभरापूर्वीच दीक्षितच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो मुंबईत आला होता. मात्र हीच त्याची कुटुंबीयांसोबतची शेवटची भेट ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

दीक्षित ‘MKD व्योम’ या ऑइल टँकरवर इतर २५ सहकाऱ्यांसोबत काम करत होता. मस्कतच्या दिशेने प्रवास सुरू असताना स्फोटकांनी भरलेली ड्रोन बोट जहाजावर येऊन धडकली. त्या वेळी दीक्षित इंजिन रूममध्ये काम करत होता. भीषण स्फोट आणि लागलेल्या आगीत त्याचा मृत्यू झाला.

या जहाजावरील इतर २५ क्रू मेंबर्सपैकी १६ भारतीयांसह सर्वांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोळंकीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर काम करणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Brother Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावानं विषारी कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस

माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Bank Holidays: कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जारी केली सुट्टयांची यादी

Zodiac Signs: ‘या’ 3 राशींचे लोक असतात सर्वात नशीबवान; आयुष्यात मिळतो पैसाच पैसा, पण कधी?

SCROLL FOR NEXT