Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : कामाठीपुऱ्याचा चेहरामोहरा बदलणार, म्हाडाने घेतला सर्वात मोठा निर्णय; आता ६५ मजली इमारती उभ्या राहणार

Kamathipura Redevelopment Update News : मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ६०-६५ मजली इमारती उभारल्या जाणार आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Kamathipura redevelopment MHADA project details : मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाला अखेर गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडाकडून (MHADA) विकासकांना 'स्वीकृती पत्र' (LOA) देण्यात आले आहे. गृहनिर्माण विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामाला दिवाळीनंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा आहे. रहिवाशांना सुरक्षित आणि आधुनिक घरे मिळणार असल्याने या प्रकल्पाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रकल्पांतर्गत कामाठीपुरा परिसरात ६० ते ६५ मजल्यांच्या टोलेजंग इमारती उभारल्या जाणार आहेत. सुमारे ३४ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या भागात सध्या ९४३ मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये ६,६२५ निवासी आणि १,३७६ अनिवासी युनिट्स असून, एकूण सुमारे ८,००१ रहिवासी आणि ८०० जमीन मालक येथे वास्तव्यास आहेत. या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा इमारतींमध्ये घरे देण्याचा म्हाडाचा मानस आहे.

पुनर्विकासानंतर प्रत्येक पात्र रहिवाशाला सुमारे ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असून, तो पूर्ण होण्यासाठी अंदाजे ७ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने काढलेल्या निविदेत 'भागीरथी हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'कामाठी डेव्हलपर्स' यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. त्यांची निविदा पात्र ठरली असून, त्यांच्यावरच या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

स्वीकृती पत्र मिळाल्यानंतर विकासकांना ४५ दिवसांच्या आत बँक गॅरंटी जमा करावी लागणार आहे. त्यानंतर म्हाडासोबत अधिकृत करार होऊन कार्यादेश (Work Order) दिला जाईल. पुढील टप्प्यात विकासकांकडून संपूर्ण प्रकल्पाचा 'मास्टर प्लॅन' तयार केला जाणार आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकासकांना विक्रीयोग्य बांधकाम करता येईल. या विक्रीयोग्य क्षेत्रापैकी ८.२५ टक्के हिस्सा म्हाडाला मिळणार असून, त्यातून सुमारे ९०० ते १००० घरे म्हाडाच्या ताब्यात येतील. ही घरे लॉटरी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्री उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साहेब, आमच्यावर दादागिरी होतेय, मी...; उद्योगमंत्री उदय सामंतसमोर शेतकऱ्याचा संताप | Video Viral

Hair Care: स्ट्रेट, कर्ली की वेव्ही? तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निवडा 'हा' परफेक्ट कंगवा

ध्वजारोहण करून परतत होता, वाटेतच काळाने गाठलं; भाजप नेत्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मोठी बातमी! राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

SCROLL FOR NEXT