Pune Nasrapur Crime Case News : नसरापूर प्रकऱणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रूग्णालयातील शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडून सुपूर्द कऱण्यात आला आहे. यातून धक्कादायक बाब उघडकीस आली. नराधम आरोपीनं मुलीनं आरडाओरडा करू नये म्हणून हत्येवेळी तिच्या तोंडात मोजा कोंबल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान मृत्यूचं कारण शोधण्यासाठी चिमुकलीच्या अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आलेत.
ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना सुपूर्द केला. मुलीच्या तोंडांत मोजा आढळल्याची संतापजनक माहिती यामधून समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडांत पायमोजा कोंबल्याची धक्कादायक माहिती समोर या अहवालातून समोर आल्याने संताप आणखी वाढला आहे. शवविच्छेदन करताना निदर्शनास धक्कादायक बाब आली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.