Mumbai Section 144 imposed from July 23 to August 6 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मोठी बातमी! मुंबईत १५ दिवसांची जमावबंदी लागू, नेमकी कशावर असणार बंदी?

Mumbai Section 144 imposed from July 23 to August 6: दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाच्या जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Priya More
  • मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत कलम १४४ लागू

  • ५ किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

  • विनापरवानगी मिरवणुकांना बंदी असेल

  • विवाह, अंत्यसंस्कार, शाळा, कार्यालये आणि नियमित व्यावसायिक व्यवहारांवर निर्बंध नाहीत

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या जमावबंदीच्या काळात नेमकी कशावर बंदी असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरामध्ये १५ दिवसांसाठी जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २३ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसंच मालमत्तेचे नुकसा होण्याची शक्यता लक्षात घेता जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

कशावर असणार बंदी?

- पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असणार आहे.

- कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी असणार आहे.

- मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड आणि फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.

कशावर बंदी नसणार?

सर्व प्रकारच्या विवाह समारंभावर बंदी नसणार आहे.

- अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी / दफन मार्गाच्या मिरवणुकीवर बंदी नाही.

- कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संगटनांच्या कायदेशीर बैठकावर बंदी नाही.

- सामाजिक मेळावे, क्लब, सहकारी संस्था, सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठीच्या बैठकांवर बंदी नाही.

- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यावर बंदी नाही.

- संमेलने आणि मिरवणुकी ज्यांना विभागीय पोलिस उपआयुक्त यांनी परवानगी दिली आहे त्यावर बंदी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT