govandi crime  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई हादरली! नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला; हात अन् चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार

Mumbai Crime News : मुंबईच्या गोवंडीमध्ये नवऱ्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने पत्नीच्या चेहरा आणि हातावर वार केलेत.

Vishal Gangurde

मुंबईच्या गोवंडीत महिलेवर जीवघेणा हल्ला

नवऱ्यानेच बायकोवर केले हत्याराने वार

महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात उडाली खळबळ

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई शहरातही विवाहित महिलांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मुंबईत नवऱ्यानेच पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. भीषण हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मुंबईच्या चेंबूरमधील घाटलामध्ये नवऱ्यानेच पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. नवऱ्याने महिलेच्या चेहरा आणि हातावर धारदार शस्त्राने वार केलाय. गोवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण घटना घडली आहे. दोघांमध्ये कशावरून वाद झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धारदार शस्त्राने वार केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले. त्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या महिलेवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईसहित देशातही महिलांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. नवऱ्याकडूनच बायकोवर जीवघेणा हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही महिलांवर हल्ला होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT