२० मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य पोलिस चकमकीत ठार.
आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला.
सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
मुंबईतील पवईत एका स्टुडिओमध्ये रहित आर्य नावाच्या व्यक्तीनं २० मुलांना डांबून ठेवलं होतं. ऑडिशनच्या नावाने बोलवून मुलांना एका खोलीत डांबवून ठेवलं होतं. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने मुलांची सुटका केली. यादरम्यान आरोपी रोहित आर्या आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाली. यात आरोपी रोहित आर्य मारला गेला.
जवळजवळ दोन तास चाललेल्या या मोहिमेत पोलिसांनी सर्व १७ मुलांना सुरक्षितपणे वाचवले. यादरम्यान रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांच्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळी पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशन चालू झालं. ऑडिशनसाठी सुमारे १०० मुले आली होती. युट्यूबर रोहित शर्मा हे ऑडिशन घेत होता. तो ५ दिवसापासून ऑडिशन घेत होता. त्यासाठी भाड्यावर एक हॉल घेतला होता. बटरफ्लॉय नावाच्या ऑफिसमध्ये ऑडिशन चालू होती. आज ऑडिशनला १०० मुले आली होती त्यातील ८० मुलांना रोहितने परत पाठवले. आणि १९ जणांना आत ठेवले आणि त्यांना ओलीस ठेवले.
रोहित आर्यने पवईतील आरए स्टुडिओमध्ये एकूण १९ जणांना ओलीस ठेवलं होतं. यात १७ मुले होती. मुलांना पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. गेल्या पाच दिवसापासून ऑडिशनसाठी मुलं येत होती. आजही ऑडिशन चालू होते, नेहमी प्रमाणे ऑडिशनसाठी आली होती ते १२ वाजता घरी जाणार होती. पण ते बाहेर आलेच नाही. त्यावेळी काही त्याची शहानिशा केली तेव्हा मुलांना खोलीत डांबून ठेवल्याची बाब समोर आली. ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि मुलांना सुरक्षितपणे सोडवलं.
मुलांना खोलीत डांबून ठेवल्यानंतर मुलं खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होते, आणि त्यांनी लोकांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. आणि काचेतून हातवारे करत मदतीसाठी बोलवत होते. दुसरीकडे रोहित मुलांना धमकावत होता. त्यावेळी रोहितचा एक व्हिडिओ मेसेज समोर आला. त्यात त्याने संपूर्ण घटनेमागील व्यक्ती स्वतः असल्याचं सांगितले. व्हिडिओमध्ये रोहितने सांगितले आहे की त्याने हे सर्व नियोजन केले होते.
मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना वाचवण्याचे ऑपरेशन अत्यंत अचूक आणि धोकादायक होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन प्लॅन आखला. मुख्य दरवाजातून आत जाणे धोकादायक होतं, म्हणून पोलिसांच्या पथकाने बाथरूममधून खोलीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अग्निशमन दलाने पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) ला परिसरात प्रवेश करण्यास मदत केली.
अग्निशमन दलाने पोलिसांना शिडी लावून पहिल्या मजल्यावर पोलिसांना प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर पोलीस बाथरूममधून खोलीत गेले. तेथे आरोपी रोहित आर्य मुलांसह उपस्थित होता. ऑपरेशन दरम्यान, अग्निशमन दलाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लागणारी सर्व तयारी करून ठेवली होती. पीआरटी किट, वेबर बचाव साधने आणि चार्ज केलेली होजलाइन तयार ठेवली. पोलिसांनी दोन तासांत सर्व १७ मुलांना सुरक्षितपणे वाचवले. जवळजवळ दोन तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवले. यादरम्यानरोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी रोहितवर गोळीबार केला. त्यात रोहित जखमी झाला, त्यात त्याचा मृ्त्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.