Mumbai : हिंदू-मुस्लिम २ माता, तरीही ४ महिन्याची मुलगी कुणाचीच नाही; मुंबईतल्या मुलीची व्यथा ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai : हिंदू-मुस्लिम २ माता, तरीही ४ महिन्याची मुलगी कुणाचीच नाही; मुंबईतल्या मुलीची व्यथा ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल

Mumbai News : हिंदू-मुस्लिम २ माता असताना ४ महिन्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी कुणीच नाही, मुलीची व्यथा ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल. ठाण्यात दोन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai News : मुंबईतून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिंदू महिलेनं मुलीला जन्म दिला, मुस्लिम महिलेने बेकायदेशीररित्या दत्तक घेतलं, पण त्यानंतर दोघींनी पाट फिरवली. ४ महिन्याच्या मुलीला एचआयव्ही पॉझिट्विव्ह असल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही महिलांनी पाट फिरवली, चार महिन्याच्या मुलीला कुणीच नाही, तिच्यावर सरकारकडून उपचार सुरू आहेत. हिंदू-मुस्लिम २ माता असताना ४ महिन्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी कुणीच नाही, मुलीची व्यथा ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल.

४ महिन्याच्या चिमुकलीला जगात आल्यापासून तिरस्कारच सहन करावा लागलाय.मुलगी पोटात असतानाच महिलेने गर्भपात करण्याचा विचार केला. नवरा सतत दारू पीत असल्यामुळे महिलेने तिला गर्भातच मारण्याचा विचार केला. पण शेजारी राहणारी एक महिलेनं दत्तक घेऊन आई होण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम महिलेने तिला गर्भपात करू नको, म्हणून समजावले. ९ महिन्यानंतर हिंदू महिलेने मुलीला जन्म दिला. मुस्लिम महिलेने दत्तक घेतलं. पण तिनेही सोडले, कारण चार महिन्याची झाल्यानंतर चिमुकली एचआयव्हीग्रस्त असल्याचे समजले.

हे धक्कादायक प्रकरण नवी मुंबईतील आहे. हिंदू महिला गर्भवती झाली होती, ती गर्भपात करण्यासाठी रूग्णालयात गेली, पण एका मुस्लिम महिलेने तिला अडवले. बाळाला मी दत्तक घेईल असे सांगितले. मुस्लिम महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. मुस्लिम महिलेच्या आधारकार्डचा वापर करत हिंदू महिलेने केईएम रूग्णालयात बाळाला जन्म दिला. बाळ जन्माला आल्यानंतर मुस्लिम महिलेने दत्तक घेतलं.

ऑक्टोबर २०२४ मध्ये बाळाचा जन्म -

मुस्लिम महिलेनं बाळाला दत्तक घेण्याचा शब्द दिला होा. त्यासाठी हिंदू महिलेने मुस्लिम महिलेच्या आधार कार्डचा वापर केला. ऑक्टोबर २०२४ मध्ये केईएम रूग्णालयात मुलीचा जन्म झाला. जानेवारी २०२५ मध्ये मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आता मुस्लिम महिलेलाही मुलगी नकोय.

कळव्याच्या रूग्णालयात उपचार

कळवामधील एका सरकारी रूग्णालयात चार वर्षांच्या चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्य महिला आणि बाल कल्याण विभागाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही महिलांविरोधात झिरो एफआयआर दाखल केली. बेकायदेशीररित्या मुलांची विक्री करण्याच्या कायद्याअंतर्गत दोघींवर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

हिंदू आणि मुस्लिम महिला कल्याणमध्ये एकाच परिसरात राहतात. हिंदू महिला सहा महिन्याची गर्भवती, त्यावेळी तिने मुस्लिम महिलेला बाळ नको असल्याचे सांगितले. त्यावेळी मुस्लिम महिलेने दत्तक घेण्याचा प्रस्तव ठेवला. हिंदू महिलेने मुस्लिम महिलेच्या ओळखपत्रावर मुलीला जन्म दिला. रूग्णालयाकडून देण्यात आलेल्या जन्माच्या दाखल्यामुळे मुस्लिम महिलेचे नाव आई म्हणून टाकण्यात आले.

एचआयव्ही असल्याचं कसं समजलं?

मुलीला रूग्णलायातून पाच दिवसानंतर घरी सोडण्यात आले. मुस्लिम महिला तिला घरी घेऊन गेली. जानेवारी २०२५ मध्ये चिमुकीलचे वाडिया रूग्णालयात अपेंडिसाइटिसचं ऑपरेशन झाले. त्यावेळी मुलीचा एचआयव्ही असल्याचे समोर आले. त्यानंतर मुस्लिम महिलेने बाळाची एचआयव्ही टेस्ट केली. एचआयव्ही झाल्याचे समजताच मुस्लिम महिलेने बाळाला दूर केले. तिने रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना सर्व काही सांगितले. रूग्णालयातील कर्मचाऱ्याने सर्व प्रकार महिला आणि बाल कल्याण विभागाला सांगितला.

ठाण्यात गुन्हा दाखल -

२८ फेब्रुवारी रोजी ठाण्यामध्ये दोन्ही महिलेच्या विरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. आधी मुस्लिम महिलेबाबत कोणताही माहिती मिळाली नव्हती, पण जन्म देणाऱ्या हिंदू महिलेबाबत माहिती मिळाली होती. तिच्याकडून मुस्लिम महिलांबाबत माहिती मिळाली. मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही महिलेविरोधात झिरो एफआयआर दाखल कऱण्यात आला आहे. दरम्यान, दत्तक घेण्याच्या नियमांचे पालन न केल्यामुळे दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक घेण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय. पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT