Mumbai Gujarat Train Derailed Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Gujarat Goods Train: गुजरातहून मुंबईला येणारी मालगाडी रुळावरून घसरली, चाके निखळली, अर्धे डबे ढिगाऱ्यात, भयंकर VIDEO

Mumbai Gujarat Goods Train Accident Near Palghar: गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे रुळावरून घसरल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर मोठा परिणाम होणार आहे.

रुपेश पाटील

एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे रुळावरून घसरली घसरली आहे. मालवाहू करणारी ही रेल्वे रुळावरून घसरली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम मोठा परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या मालवाहू रेल्वेचे डब्बे पालघर रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले आहेत. यामुळे लोकल ट्रेनच्या व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. रेल्वे प्रशासन आणि येथील टेक्निकल टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे.

मिळाल्या माहितीनुसार, मुंबईकडे ही मालगाडी घेऊन जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना अपघात घडला आहे. मुंबईकडे जाणारे वाहतूक सध्या ठप्प आहे. या अपघात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डबे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली आहे.

घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चारली धुळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT