Mumbai Goa Vande Bharat Ticket Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Goa Vande Bharat Ticket: मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; वाचा कसा असेल मार्ग

mumbai goa vande bharat express route: मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनचे तिकीट किती असणार? ती कोणकोणत्या थांब्यावर थांबणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Goa Vande Bharat Route: मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबईतून गोवा केवळ ७ तासात गाठता येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या शनिवारी, म्हणजेच 3 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (Latest Marathi News)

त्यानंतर, 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. दरम्यान, मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनचे तिकीट किती असणार? ती कोणकोणत्या थांब्यावर थांबणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुंबई-गोवा ८ तासांपेक्षा कमी प्रवास

मुंबई-गोवा (Mumbai-Goa) वंदे भारत ट्रेनला जवळपास ११ थांबे असतील. त्याचबरोबर मुंबई ते मडगाव ५८६ किमी अंतर कापण्यासाठी एक्सप्रेसला ८ तासांपेक्षा कमी वेळ लागेल. सेमी-हाय-स्पीड एक्सप्रेसमुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास कमी वेळेत होईल.

सध्या या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन तेजस एक्सप्रेस (Express) आहे. तेजसला हेअंतर कापण्यासाठी जवळपास ८ तास ५० मिनिटे लागतात. दरम्यान, या ट्रेनचा सर्वात जास्त फायदा हे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना होईल.दरवर्षी हजारो चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जास असतात.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर किती?

रेल्वेच्या सूत्रांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनने मुंबई ते मडगाव एससी चेअर कारमध्ये प्रवासासाठी सुमारे १,७४५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २,८७० रुपये तिकीट दर आकारले जाणार आहेत. (Breaking Marathi News)

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस वेळापत्रक

हाती आलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मडगावकडे रवाना होईल. दुपारी साडेबारा वाजता मडगाव स्थानकात पोहचणार आहे. तसेच हीच गाडी मडगाव येथून दुपारी दीड वाजेच्या सुमारास निघेल. रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल. मंगळवार वगळता सर्व दिवस गाडी सुरू राहणार आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस थांबा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील दादर, ठाणे, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वे थांबा देणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : व्हेज नूडल्समध्ये सापडले चिकनचे तुकडे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या शाकाहारी जोडप्याचा संताप

WhatsApp Privacy: व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग पूर्णपणे खाजगी ठेवायचंय? मग 'ही' सेटिंग लगेच अ‍ॅक्टिव्ह करा

Hair Care: चहाच्या पानांच्या पाण्याने केस धुण्यामुळे होतील 'हे' फायदे

Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजना फेल; राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार|VIDEO

Maharashtra Live News Update : 'कोणाच्या कानाखाली आवाज काढणं खूप सोपं असतं' : बच्चू कडू

SCROLL FOR NEXT