RBI on 500 Rs Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेय आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहेत. आता या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये रांगा लावण्यास सुरूवात केली आहे. अशातच ५०० रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयने महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
नुकताच आरबीआयने आपला वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात ५०० रुपयांच्या नोटांबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये ५०० रुपयांच्या सुमारे ९१ हजार ११० बनावट नोटा पकडण्यात आल्या.
२०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत याचे प्रमाण १६.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०२०-२१ मध्ये ५०० रुपयांच्या ३९,४५३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर २०२१-२२ मध्ये ७६ हजार ६६९ किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या.
त्यामुळे एकीकडे आरबीआयने (RBI) बनावट नोटांच्या भीतीपोटी २००० रुपयांच्या नोटा बंद केल्या असल्या तरी बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटाचं आव्हान बँकेसमोर आहे. दरम्यान, ५०० रुपयांशिवाय २० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाणही वाढले आहे.
२०२२-२३ मध्ये २० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये (Fack Currency) ८.४ टक्के वाढ झाली आहे. १० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत ११.६ टक्क्यांनी घट झाली आहे, तर १०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत १४.७. टक्क्यांनी घट झाली आहे. (Breaking Marathi News)
सध्याच्या घडीला बाजारात १० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मार्च २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण चलनापैकी ३७.३९ टक्के वाटा हा ५०० रुपयांच्या नोटांचा आहे. त्यानंतर १० रुपयांच्या नोटांचा वाटा आहे. त्यामुळे आता बाजारातून ५०० रुपयांच्या बनावट नोट चलनातून बाहेर काढण्याचे मोठं आव्हान आरबीआयसमोर आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.