Ratnagiri Accident
Ratnagiri Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Ratnagiri Accident : दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

Accident : अपघाच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आज एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातातील मृत्य व्यक्ती चिपळूण येथील असल्याची माहिती मिळाली असून मृत व जखमी व्यक्तींची ओळख अद्याप पूर्ण पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघाताचा थरार; चार वाहनांचा जागीच चक्काचूर

रत्नागिरीसह मुंबई गोवा महामार्गावर MIDC जवळ देखील ४ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत. मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) महाड MIDC नजीक नडगाव हद्दीत दोन पिकअप, एक स्कॉर्पिओ आणि केटीएम मोटर सायकल या चार वाहनांमध्ये विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातामध्ये मोटर सायकलवरील दोन जण गंभिररित्या जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ, पिकअप, केटीएम मोटर सायकल ही तीन वाहने महाडच्या दिशेने तर एक पिकअप टेंपो MIDC च्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये मोटर सायकल सह सर्वच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अपघातग्रस्त वाहन रस्त्यात असल्याने काहीकाळ वाहतुक बंद राहिली होती. घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून रस्त्यावरील वाहने हटवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी आता वाहतूक सुरळीत झाली आहे. हा अपखघात इतका भीषण होता की, चारही वाहनांचा यामध्ये अगदी चक्काचूर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT