Ghatkopar Fire  Saam tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Fire : मुंबईतील घाटकोपरमध्ये भीषण आग; हवेत पसरले धुराचे लोट, घटनेनंतर लोक धावले रस्त्यावर

Mumbai Ghatkopar Fire News : मुंबईतील घाटकोपरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर हवेत धुराचे लोट पसरले आहेत. या आगीच्या घटनेनंतर लोक रस्त्यावर धावले.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Ghatkopar Fire : मुंबईत दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगावतील पूर्वेत प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागली. त्यानंतर आता घाटकोपरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने परिसरतील लोकांमध्ये घबराट पसरली.

हवेत पसरले धुराचे लोट

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या नारायण नगर विभागात एक प्लॅस्टिकचे रॅपर बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या कारखान्याच्यावर सम्राट नावाची शाळा आहे. सुदैवाने ही शाळा बंद होती. गोदामाची आग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे. घटनेनंतर अग्मिशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

आगीनंतर लोकांची धावाधाव

घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये सम्राट शाळेजवळ नेमकी कशी आग लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या जीवितहानी झाल्याविषयी माहिती हाती आलेली नाही. या आगीत नागरिकांचं नेमकं किती नुकसान झालं, याविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र, आग लागल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये एकच धावाधाव निर्माण झाल्याचे दिसून आलं.

गोरेगावात ऑइल टँकरला आग

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात बुधवारी ऑइलच्या टँकरला मोठी आग लागल्याची घटना घडली. या घटनेने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातून टँकर जात होता. या ऑईल टँकरला अचानक आग लागली. अग्निशमन दलाचा तीन गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल अर्धा तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागल्याची माहिती मिळताच ऑइल टँकर चालक सुदैवाने बाहेर निघाला. आग कशामुळे लागली, या संदर्भात स्थानिक पोलीस तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT