Mumbai News: मृतदेहाचा पंचनामा करायला गेले अन् पोलीस उपनिरीक्षक पुलावरून खाली पडले; प्रकृती चिंताजनक

Dahisar News: दहिसरमध्ये मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश खरात पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाले आहेत.
Saam Tv
Mukesh KharatSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईच्या दहिसर परिसरातील भगवती रुग्णालयाच्या जवळील पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करताना 15 फूट उंचावरून नाल्यात पडून पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मुकेश खरात, असं जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. काल सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली.

बेवारस मृतदेहाचा पंचनामा करत असताना रेल्वेचा भोंगा ऐकून मुकेश खरात हे पंधरा फूट खोल नाल्यात पडले. पुलावरून पडल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर आता पुढील उपचारासाठी मुकेश खरात यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

Saam Tv
Crime News: भयंकर! दारुचा ग्लास उष्टा केल्याचा राग आला, स्क्रू ड्रायव्हरने वार करुन एकाला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास दहिसर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या सुधीर फडके उड्डाणपुलाखाली एक बेवारस महिलेचा मृतदेह असल्याची माहिती एम एच बी कॉलनी पोलिसांना फोनवरून मिळाली. माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश विष्णू खरात हे आपल्या टीमसोबत घटनास्थळावर पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक खरात आणि त्यांच्या टीम कडून बेवारस मृतदेहाचा पंचनामा देखील करण्यात आला.

यानंतर महिलेचा तो मृतदेह शेवटन करण्यासाठी पालिकेच्या भगवती रुग्णालयाकडे पाठवण्यात आलं. मात्र त्याच दरम्यान रेल्वे रुळावरून जात असताना जोराचा भोंगा वाजवण्यात आला त्यामुळे उड्डाणपूला खालील खांबावर उभे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक खरात हे गोंधळून गेले आणि मागे पाहत असताना त्यांचा तोल जाऊन ते पंधरा फूट खाली नाल्यात पडले. नाल्यातील दगड गोट्यांवर डोके आदळल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खरात यांना बोरिवली पश्चिमेकडील करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. करुणा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर आता खरात यांना पुढील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Saam Tv
Crime News: प्रियकरासाठी तरुणीने अख्खं कुटुंबच संपवलं, १३ जणांचा घेतला जीव; नेमकं प्रकरण काय?

खरात यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मेंदू अंतर्गत रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अजूनही खरात हे शुद्धीवर आले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com