Mumbai Sakinaka Fire Saam tv
मुंबई/पुणे

Sakinaka Fire: मुंबईतील साकीनाका परिसरात कारखान्याला आग, अग्निशमन दलाचे ८ वाहने घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईत दिवसभरात आगीची दुसरी घटना समोर आली आहे. मुंबईतील लोअर परळला आग लागल्यानंतर आता साकीनाक्यात आगीची घटना घडली आहे. साकीनाका परिसरातील एका कारखान्याला आग लागली आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai Sakinaka Fire:

मुंबईत दिवसभरात आगीची दुसरी घटना समोर आली आहे. मुंबईतील लोअर परळला आग लागल्यानंतर आता साकीनाक्यात आगीची घटना घडली आहे. साकीनाका परिसरातील एका कारखान्याला आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai Fire) साकीनाका परिसरात कारखान्याला आग लागली. सोमवारी दुपारच्या वेळेस ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील साकीनाका परिसरातील सलीम स्टेट नावाच्या कारखान्यात आग लागली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी या या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या संपूर्ण घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही,अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आगीचे मुख्य कारण शॉक सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत फिनिक्स मॉलला आग

मुंबईच्या लोअर परळ येथील फिनिक्स मॉलला सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. फिनिक्स मॉलमधील पार्किंगमध्ये ही आग लागली. या आगीत पार्किंगमधील २५ ते ३० दुचाकी जळून खाक झाल्या.

या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या पार्किंगला नेमकी आग कशी लागली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. आगीत कोणत्याही जीवितहानी झाली,नसल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT