Mumbai Fire News: Massive Fire at slums Area of Mumbai's Malad Region Saam Tv
मुंबई/पुणे

Malad Fire: आगीचं सत्र सुरुच! मुंबईतील मालाडमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

Massive Fire at Mumbai's Malad Area (Triveni Nagar Slum): मुंबईत आगीचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये आग लागली होती. त्यानंतर आज मुंबईच्या मालाडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Malad Fire News:

मुंबईत आगीचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये आग लागली होती. त्यानंतर आज सोमवारी मुंबईच्या मालाडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड त्रिवेणीनगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. झोपडपट्टीतील घरांना आग लागल्यानंतर परिसरातच एकच खळबळ उडाली. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

मालडमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील त्रिवेणीनगर या झोपडपट्टीला मोठी आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT