Roof leaked of Vikroli's Mhada House Saam TV
मुंबई/पुणे

Vikroli Mhada House: म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, पण पहिल्याच पावसात छत गळालं; विक्रोळीतील धक्कादायक VIDEO

Satish Daud

मयुर राणे, साम टीव्ही मुंबई

मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकदा हे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण होतं. स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख आहे. मात्र, आता हीच ओळख पुसत चालली आहे. कारण, नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या लॉटरीत विक्रोळी येथे अनेकांना घरे मिळाली. पण पहिल्याच पावसात या घरांना गळी लागली. त्यामुळे घर विजेते हैराण आहेत. या प्रकारामुळे म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

म्हाडाच्या 2023 मधील लॉटरीत अनेक ठिकाणी घर निघाली होती. त्यामध्ये मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथे देखील 415 स्कीम हा म्हाडाचा एक प्रोजेक्ट झाला. त्यात अनेकांना घर लागली. हे घर साधारण प्रत्येक विजेत्याला 40 लाख रुपयांना पडले. मात्र, त्या बदल्यात विजेत्यांना घरात राहण्यासाठी आल्यापासून फक्त समस्याच जाणवत आहेत.

एकीकडे पाणी न येणं, लिफ्ट चा प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम ते कमी तर त्यात आता पावसाळ्यात घराला गळती लागली आहे. त्यामुळे विक्रोळी 415 म्हाडा घर विजेते त्रस्त झाले आहेत. "कर्ज काढून मुंबईत घर घ्याव या दृष्टीने आम्ही येथे अर्ज भरून घर घेतलं. मात्र, आमची हिरमोड झाली आहे. घरात राहिला आल्यापासून अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागत आहे", असं याठिकाणचे रहिवासी सांगत आहेत.

"पाणी प्रश्न, पार्किंग, लिफ्ट समस्या अशा अनेक समस्यांना आता सध्या आम्हाला सामोरे जावे लागतंय. यात आता पाऊस पडतोय आणि आमच्या सर्व घरांना लिकेज होऊ लागले आहे. त्यामुळे घर घेतलं ही आमची चुकी झाली का असा प्रश्न आम्हाला पडला आहे", अशी खंतही म्हाडा घर विजेत्यांनी बोलून दाखवली आहे.

काही रहिवाशांनी या महाडाच्या इमारतीच्या बांधकामावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. आत्ताच ही परिस्थिती आहे तर पुढे काय? ज्या बिल्डरने ही घर बांधलेली आहेत त्याच्यावर म्हाडा प्रशासनानेचौकशी करून कारवाई करायला हवी. तसेच आमच्या इमारतीची व्यवस्थित पाहणी करून काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहेत.

दरम्यान, स्कीम क्रमांक 415 मधील इमारतीमध्ये तीन विंग आणि 258 घरं आहेत. सध्या शिर्के बिल्डरकडे या इमारतीचे वर्षभरासाठी मेंटेनन्स चार्ज आहे. नवीन म्हाडाच्या इमारतीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात घर विजेते वारंवार बिल्डरकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, त्याला बिल्डर प्रशासनाकडून कोणतीही दाद देण्यात येत नाही. त्यामुळे आता घर विजेते हे महाडा प्रशासनाकडे दाद मागणार आहेत.

दुसरीकडे इमारतीला लागलेल्या गळतीप्रकरणी म्हाडा प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या इमारतीच्या घटनेनंतर म्हाडामार्फत अनेक बिल्डर कडून अशाप्रकारे ढिसूळ बांधकाम होत असेल तर म्हाडा प्रशासनाने यासंदर्भात दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे, असं म्हाडा घर विजेते आणि लॉटरीसाठी अर्ज करणारे सांगतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Marathi News Live Updates : आज मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला नाशिकहून कार्यकर्ते रवाना

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

SCROLL FOR NEXT