Mumbai Delhi Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Delhi Expressway: मुंबई ते दिल्ली सुसाट! २४ तासांचा प्रवास आता फक्त १२ तासात; कसा असेल महामार्ग?

Mumbai Delhi Expressway Project: दिल्ली ते मुंबई महामार्गाचं काम वेगाने सुरु आहे. या महामार्गामुळे अवघ्या १२ तासात दिल्ली गाठता येणार आहे. यातील वडोदरा मुंबई महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे.

Siddhi Hande

मुंबई दिल्ली महामार्गाचं काम जोरात सुरु

मुंबई ते वडोदा मार्गाचं काम अंतिम टप्प्यात

अवघ्या १२ तासात मुंबईवरुन दिल्ली गाठता येणार

आता मुंबईवरुन थेट दिल्ली गाठता येणार आहे. दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. या प्रकल्पाचे काम जलद वेगाने सुरु आहे आणि लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.

नितीन गडकरी यांनी या प्रोजक्टची पाहणी केली. गुजरातमधून जाणाऱ्या एक्सप्रेसवेची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्व अडथळे दूर करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. रस्ता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा बाधला जात आहे.

कसा असणार महामार्ग? (Mumbai Delhi Expresway Route Map)

दिल्ली-मुंबई हा द्रुतगती मार्ग ८ पदरी असणार आहे. या मुंबई दिल्लीचा प्रवास फक्त १२ तासांवर येणार आहे. प्रवाशांचा अर्धा वेळ वाचणार आहे. सध्या दिल्ली- मुंबई प्रवासासाठी २४ तास लागतात. हा प्रवास थेट १२ तासांवर येणार आहे.

या द्रुतगती मार्गामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय थेट दिल्ली गाठता येणार आहे. या प्रकल्पासाठी जगातील सर्वात जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहेत. यामुळे प्रकल्पाचा खर्च नियंत्रणात ठेवण्यात मदत होईल. या प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.याचसोबत नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे. या एक्सप्रेसवेच्या बाजूला झाडे लावली असणार असल्याचे नितीन गडकरींना सांगितले.

तीन राज्यांना जोडणार (Mumbai Delhi Expressway Joins 3 States)

मुंबई ते दिल्ली द्रुतगती मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढे उत्तर प्रदेश आणि राजस्थानशी जोडला जाणार आहे. म्हणजेच या प्रकल्पामुळे मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशी चार राज्ये जोडली जाणार आहे.

या भागाचे काम शेवटच्या टप्प्यात

या प्रकल्पातील वडोदरा-मुंबई या ३७९ किमीच्या महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाअखेर म्हणजे एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. हा द्रुतगती मा्ग १३५९ किमी लांब असणा असून वडोदरा मुंबई विरारमोार्गे जोडला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anti Aging Diet: टवटवीत, मऊ आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी कोणता आहार घ्यावा?

Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! तान्या मित्तलनं बिग बॉसमधील 'या' सदस्यावर केली काळी जादू? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Live News Update: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

Team India: विराट-रोहितला मिळणार 'फुल इज्जत', गंभीर-आगरकरचा BCCI घेणार क्लास, बोलवली तातडीची बैठक

Aliv Kheer Recipe: रोज काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी अळीवाची खीर

SCROLL FOR NEXT