Dhanshri Shintre
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा देशातील प्रमुख प्रकल्प असून, दिल्ली आणि मुंबई शहरांना जलद आणि सोप्या मार्गाने जोडतो.
मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेचा कामाचा कालावधी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला आहे.
सुरुवातीला, या प्रकल्पाचे 2023 मध्ये पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले होते.
नंतर, प्रकल्प 2025 च्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज दिला गेला होता.
गुजरात आणि महाराष्ट्रमधील अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या एक्सप्रेसवेच्यामुळे दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांपर्यंत घटेल.
हा एक्सप्रेसवे सुमारे 1,382 किलोमीटर लांब असून, देशातील महत्त्वपूर्ण वाहतूक मार्गांपैकी एक आहे.
यामुळे दिल्ली-मुंबई दरम्यान वाहतूक सुलभ होऊन आर्थिक प्रगतीला मोठा चालना मिळेल.