Mumbai- Delhi Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai- Delhi Expressway: ६ राज्य, १३५५ किमीचा मार्ग; २५ तासांचा प्रवास फक्त साडेबारा तासांवर; मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वे कधी सुरू होणार?

Delhi To Mumbai Highway: मुंबईवरून दिल्लीला पोहचणं आता अधिक सोपं होणार आहे. या दोन्ही आर्थिक राजधानी असणाऱ्या शहरांना नवीन एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे कधीपर्यंत सुरू होणार? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • मुंबई–दिल्ली एक्स्प्रेस वे लवकरच सुरू होणार

  • हा देशातील सर्वात लांब १३५५ किमीचा हाय-स्पीड मार्ग असेल

  • हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ २५ तासांवरून फक्त साडेबारा तासांवर येणार आहे

  • हा एक्स्प्रेस वे ६ स राज्यांतून जाणार आहे

मुंबईपासून थेट दिल्लीपर्यंत प्रवास करणं आता अधिक सोपं होणार आहे. यासाठी मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वे तयार केला जात आहे. हा एक्स्प्रेस वे नवीन इतिहास रचण्यासाठी तयार झाला आहे. हा एक्स्प्रेस वे देशातील दोन प्रमुख आर्थिक राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडला जाणार आहे. ६ राज्यातून हा एक्स्प्रेस वे जाणार आहे. ६ ते ८ लेनचा हा एक्स्प्रेस वे भविष्यात १२ लेनपर्यंत वाढवला जाणार आहे. या एक्स्प्रेस ेवेमुळे मुंबई ते दिल्ली प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होईल.

महत्वाचे म्हणजे हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त साडेबारा तासांचा होणार आहे. सध्या दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी २५ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे प्रवासाचा कालावधी निम्म्याहून कमी होणार आहे. हा प्रोजेक्ट भारतीय रस्ते इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोडेक्टपैकी एक असणार आहे. हा एक्स्प्रेस वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधला जात आहे. या एक्स्प्रेस वेच्या १,३५५ किलोमीटरच्या या मार्गापैकी ७७४ किलोमीटर आधीच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे आणि उर्वरित भाग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.

मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी अंदाजे १ लाख कोटी रुपयांचा खर्च आला आहेत. या एक्स्प्रेस वेचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना जोडला जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्लीच्या डीएनडी फ्लायवे आणि हरियाणातील सोहना येथून सुरू होईल. तर महाराष्ट्रातील विरार आणि जेएनपीटी बंदरावर संपेल. या एक्स्प्रेस वेवर १२० किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करता येईल. त्यामुळे लांबचा प्रवास कमी वेळात पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेसाठी एकूण १५००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन वापरली गेली आहे.

मुंबई- दिल्ली एक्स्प्रेस वेची वैशिष्ट्ये -

- एकूण लांबी - १३५५ किलो मीटर

- एकूण खर्च - जवळपास १ लाख कोटी रुपये

- लेन - ८ लेन (इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेगळी लेन)

- कोणत्या राज्यातून जाणार? - दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र

- कुठून होणार सुरूवात? - डीएनडी फ्लाईवे (दिल्ली) आणि सोहना (हरियाणा)

- कुठे संपणार? - विरार आणि जेएनपीटी पोर्ट (महाराष्ट्र)

- वेग मर्यादा- १२० किमी प्रतितास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

AC Fridge Price Hike: २०२६ च्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका; AC, फ्रिजच्या किंमती वाढल्या

एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसर्‍याचा AB फॉर्म गिळला अन् विषयच संपवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

SCROLL FOR NEXT