Mumbai Dam Water Leve Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं तुडूंब भरली; कोणत्या तलावात किती पाणीसाठा? पाहा...

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ही सर्व धरणं तुडूंब भरली आहेत.

Priya More

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला असून नागरिकांना दिलासा मिळाला. अशामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ही सर्व धरणं तुडूंब भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९४.८७ टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबई महानगर पालिकेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९४ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,७३,०७० दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९४.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १२,६४,२०१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८७.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९२.३५ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९८.४५ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९७.२४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९३.०७ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT