Jayakwadi Water Level : जायकवाडी धरण 4 दिवसातच निम्मं भरलं, मराठवाड्याला मोठा दिलासा; पाहा धरणातील आजचा पाणीसाठा

Jayakwadi Dam Water Level Today : पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 50 टक्क्यांच्या वर गेलाय.
Jayakwadi Dam Water Level Today
Jayakwadi Dam Water Level TodaySaam TV
Published On

मागील 4 दिवसांपासून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 50 टक्क्यांच्या वर गेलाय. त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय.

Jayakwadi Dam Water Level Today
Maharashtra Weather Update: राज्यात पुढचे ४ दिवस कसा राहिल पाऊस? हवामान खात्याचा महत्वाचा अंदाज

नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर मंगळवारी सकाळी देखील पाण्याखाली होता. अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. गंगापूर आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी गोदावरी नदीचा पूर काहीसा कमी झालाय.

नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 9 धरण ओवर फ्लो झाले आहेत. तर 17 धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील धरणांमधून देखील गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल असून सध्या 77 हजार 115 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याची तहान भागणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

जायकवाडी धरणात किती टक्के पाणीसाठा?

आज म्हणजेच सकाळी जायकवाडीत (Jayakwadi Dam) 53.41% इतका पाणीसाठा जमा झाला आहे. येत्या 24 तासांत या पाणीसाठ्यात आणखीच वाढ होणार आहे. मागच्या आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला होता. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीतून पाण्याची मोठी आवक जायकवाडीमध्ये सुरू आहे.

या पाण्यामुळे संभाजीनगर जालना जिल्ह्यासह साडेचारशे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. विशेष म्हणजे यंदाचा पावसाळा अर्धा उलटुन गेला तरीही मोठा पाऊस झाला नसल्याने भविष्यातील पाणीटंचाईची भीती वाटत होती. मात्र जायकवाडीच्या साठ्याने ती भीती दूर केली आहे. अशीच आवक राहिली तर धरणातील साठा येत्या दोन-तीन दिवसात 65 पर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे.

Edited by - Satish Daud

Jayakwadi Dam Water Level Today
Solapur News : महाराष्ट्र पुन्हा हादरला! चॉकलेटचे अमिष दाखवून शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य; दोन वृद्धांवर गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com