Tansa Dam News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ, सध्या 7 धरणांमध्ये किती जलसाठा?

Mumbai Rain News : मुंबईकरांची मे महिन्यापर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

महिनाभरापासून रुसलेल्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाने दोन दिवस दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांच्या जलसाठ्याचा चांगली वाढ झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये एकूण ९६ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. यातून मुंबईकरांची मे महिन्यापर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार ७ तलावांमध्ये दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुढील २२ दिवस पुरेल इतक्या पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती. पाऊस पडला नसता तर मुंबईमध्ये १० ते २० टक्के पाणीकपात करण्याचा विचार महापालिकेचा होती. (Latest Marathi News)

सध्या तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार हे चारही तलाव १०० टक्के भरले आहेत. तर भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे अजून १०० टक्के भरलेली नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात पाऊस असाच सुरु राहिल्यास ही धरणेही १०० टक्के भरतील, तर मुंबईकरांची पाण्याची चिंताही १०० टक्के मिटेल. (Mumbai News)

धरणातील पाणीसाठा

  • मोडक सागर- १०० टक्के

  • तानसा - ९९.०२ टक्के

  • विहार - १०० टक्के

  • तुलसी- १०० टक्के

  • भातसा- ९८.२० टक्के

  • मध्य वैतरणा - ९६.९८ टक्के

  • अप्पर वैतरणा- ८८.४४ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT