चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण

Sangli Horror Case: सांगलीच्या विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने चार वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल १८ महिन्यांच्या आत देण्यात आला आहे.
Sangli Horror Case:
SANGLI CHILD RAPE AND MURDER CASE: DEATH PENALTY TO CONVICT IN FAST-TRACK POCSO COURT VERDICTsaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील चिमुरडी अत्याचार प्रकरण

  • सांगली पॉक्सो न्यायालयाचा निकाल

  • दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली

विजय पाटील, साम प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दीड वर्षात निकाल दिलाय. जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने नराधमाला दोषी ठरवत त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय. पुण्याच्या नसरापूर येथील घटनेनंतर राज्यात चिमुरड्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात अवघ्या दीड वर्षात जलदगतीने न्यायालयात सुनावणी पूर्ण झालीय.

Sangli Horror Case:
प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

इतक्या जलदगतीने शिक्षा सुनावण्याची ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. या प्रकरणी सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारची बाजू मांडली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीचा जुना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड न्यायालयात मांडत, अशा नराधमाला समाजाच्या हितासाठी फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचं म्हणत जोरदार युक्तिवाद केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी ही आपल्या आजीकडे राहत होती. तिची आई कर्नाटकातील मुधोळ येथे माहेरी गेली होती. तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीत गेले होते. दोन फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही न सापडल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Sangli Horror Case:
Washim Crime: अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, मृतदेह शेतात फेकला

आरोपी शोधमोहिमेत सामील झाला

विशेष म्हणजे आरोपीही मुलीला शोधण्यासाठी धावपळ करत होता. आरोपी हा मुलीच्या घराच्या मागे राहत होता. पांडुरंग कळ्ळी असं आरोपीचं नाव आहे. हा स्वतः गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधमोहिमेत सामील झाला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेचा मृतदेह आपल्या घरातील लोखंडी पेटीत प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवल्याचं सांगितलं.

या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. आरोपीला कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com