Mumbai Dam Water level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची चिंता कायम; मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा ताजी आकडेवारी

Mumbai Dam Water Level Today: मुंबईकरांची पाणी चिंता कायम आहे. ७ धरणात किती टक्के पाणीसाठा आहे, याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. वाचा ताजी आकडेवारी

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबई शहर आणि जवळच्या परिसरात मागील काही दिवसांत पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात वाढ झाली. मात्र, पाणीसाठ्यात झालेली वाढ फारशी दिलासादायक नाही. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई आणि परिसरातील भागात सोमवारी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे ७१ हजार १४७ दशलक्ष लिटर पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. या पावसामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांच्या पाणीसाठ्याची चिंता मिटल्याचं सांगण्यात आलं. या मुसळधार पावसामुळे अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणातील पाणीसाठा वाढला.

या सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरची क्षमता आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळूनही नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईकरांची पाणीचिंता कायम

मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये सुमारे २०% पाणीसाठा आहे. या ७ धरणांमध्ये किमान ८०% पाणीसाठा झाल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ

पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये 30 मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने परिणामी धरण साठ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली. पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची लवकरच शक्यता आहे.

४ धरणातील असलेला पाणीसाठा (टक्केवारी)

खडकवासला: 54.39 टक्के

पानशेत: 31.81 टक्के

वरसगाव: 18.95 टक्के

टेमघर: 18.13 टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : जुगाराचा नवा फंडा! फायटर कोंबड्यांची झुंज लावून पैशांचा खेळ, पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाणी टंचाई

Prajakta Mali: दिवाळीसाठी प्राजक्ता माळीचा खास लूक; PHOTO पाहा

Virender Sehwag Birthday: अंपायरला भारतात करून दिली शॉपिंग आणि पुढच्याच सामन्यात...! वीरूने ऐकवलेला भन्नाट किस्सा

Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?

SCROLL FOR NEXT