Mop Water : फरशी साफ करताना पाण्यात 'या' गोष्टी मिक्स करा; घरात एकही माशी आणि झुरळ येणार नाही

Mop Water Detergent Powder : डिटर्जंट पावडर तसेच सुगंधीत लिक्विडने माशी घरात येणार नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र लादी पुसण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्यात नेमकं काय मिसळलं पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Mop Water Detergent Powder
Mop WaterSaam TV
Published On

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसामुळे घरात तसेच दुकानात आणि बाहेर सर्वत्र माशा, मच्छर आणि झुरळं आल्याचे दिसतात. माशांमुळे अनेक नागरिक हैराण झालेत. व्यक्ती झोपलेले असताना देखील माशांच्या आवाजाने झोप लागत नाही. त्यामुळे माशा किंवा झुरळ तसेच पावसाळ्यात घरात येणाऱ्या किटकांना पळवून लावण्यासाठी आम्ही एक रामबाण उपाय शोधला आहे.

Mop Water Detergent Powder
Nashik Water Scarcity : दमदार पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा; प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

घरामध्ये साफसफाई करताना आपण हमखास फरशी पुसण्याच्या पाण्यात विविध लिक्विड मिक्स करतो. डिटर्जंट पावडर तसेच सुगंधीत लिक्विडने माशी घरात येणार नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र लादी पुसण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्यात नेमकं काय मिसळलं पाहिजे हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

लिंबू आणि मीठ

फरशी पुसण्याच्या पाण्यात नेहमी मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा. या पाण्याने लादी पुसल्याने किंवा घारातील सर्व वस्तुंची साफसफाई केल्याने घरात एकही माशी किंवा झुरळ येणार नाही. तुम्ही लिंबाच्या रसमध्ये मीठ मिक्स करून हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकता.

काळी मिरी

छोटीशी काळीमीरी घराच्या साफसफाईमध्ये तुमची मोठी मदत करेल. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात काळी मिरी पावडर मिक्स करा. काळी मिरी पावडरचा स्मेल माशा आणि झुरळ यांना सहन होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ते येत नाहीत.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

पाण्यामध्ये फेस यावा आणि जमीन स्वच्छ व्हावी यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करा. त्यानंतर त्याच पाण्यात व्हिनेगर सुद्धा मिक्स करा. बाहेरील पावडर वापरण्यापेक्षा घरातील या वस्तू वापरल्याने घराची मस्त साफसफाई होते.

Mop Water Detergent Powder
Mumbai Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला, वाचा आजची ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com