Dahisar Society 
मुंबई/पुणे

Dahisar Society: सोसायटी मिटिंगमधला वाद सभासदाला पडला महागात; मिटिंगमध्ये नडला, अंगठाच तोडला

Dahisar Society: दहिसरमधील एका अपार्टममेंटमध्ये सोसायटी अध्यक्ष आणि सभासदामध्ये वाद झाल्याची घटना घडली. यात अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठाच चावून तोंडून टाकलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

तुम्ही जर सोसायटीच्या मिटिंगला जात असाल तर तुम्हाला वेळीच सावध करणारी एक महत्वाची बातमी. सोसायटीच्या मिटिंगमध्ये वाद घालू नका. नाहीतर तुम्हालाही अंगठा गमवावा लागेल. हे आम्ही अशासाठी सांगतोय. कारण मुंबईत एका सोसायटीच्या बैठकीत असाच वाद विकोपाला गेला आणि एका सदस्याला आपला अंगठा गमवावा लागला. काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूयात.

सोसायटीच्या मिटिंगमधला वाद तसा नवीन नाही. मिटिंगमध्ये हमरीतुमरी झाल्याचे प्रकार तुम्ही अनेकदा अनुभवले असतील, मात्र आम्ही तुम्हाला आता जे दृश्य दाखवणार आहोत. जे पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. रक्तानं माखलेला हा एका सभासदाचा अंगठा आहे.

त्याच्यावर कुणी गुंडानं हल्ला केलेला नाही. तर त्याच्याच सोसायटीच्या अध्यक्षानं हा लचका तोडलाय. मुंबईच्या दहिसरमधल्या म्हात्रेवाडीत अमरनाथ सोसायटीची मीटिंग होती. या मिटिंगमध्ये सदस्य आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी आदित्य देसाईंचा अंगठाच तोडला. हे प्रकरण आता एमएचबी कॉलनी पोलिसांत गेलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT