Mumbai Dahi Handi accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Mumbai Dahi Handi accident : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ जण जखमी

जखमी गोविंदावर रुग्णालयात उपाचर सुरु

काहींना उपचार केल्यानंतर घरी सोडलं

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवात अपघातांची मालिका सुरुच आहे. मुंबईत आतापर्यंत ७५ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली आहे. तर मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आनंदाच्या उत्साहात विरजण पडलं.

मुंबईत आज शनिवारी दिवसभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचं भव्य आयोजन पाहायला मिळालं. मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडल्या. यावेळी गोविंदा पथकातील गोविंदा डिजेच्या गाण्यावरही थिरकले. गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

मुंबईतील ठिकठिकाणी दहीहंडीसाठी थर लावताना कोसळून अनेक गोविंदा जखमी झाले. आतापर्यंत ७५ गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईच्या कांदिवलीत येथील ९ वर्षीय गोविंदा आर्यन यादववर उपचार सुरू आहेत. तर २३ वर्षीय श्रेयस चाळके याला जी.टी. रुग्णालयात गंभीर दुखापतीमुळे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दुपारपर्यंत ३० गोविंदा जखमी झाले होते. दहीहंडी उत्सवात दुपारी ४ पर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाल्याची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून मिळाली आहे. त्यापैकी १५ जणांवर उपचार सुरू होते. उपचारानंतर १५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सायन रुग्णालयात १८, केईएममध्ये ६ तर नायरमध्ये ६ गोंविदा दाखल झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

मुंबईत एकाचा मृत्यू

मुंबईच्या मानखूर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जगमोहन शिवकिरण चौधरी असे गोविंदाचे नाव आहे. दहीहंडीसाठी दोरी बांधताना तोल जाऊन कोसळला. त्यानंतर जगमोहनला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

SCROLL FOR NEXT