Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

Mumbai Crime News : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. सायकसहित ११ डबे घेऊन चोरटा फरार झाला. त्याचा फोटो आता व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

चोरट्याचा डबेवाल्याच्या डब्यांवर डोळा

चोरीच्या घटनेने डबेवाले वर्गात खळबळ

डबेवाल्याकडून दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई शहरातील डबेवाले नेटवर्कची शिस्त आणि प्रामाणिकपणा ओळखली जाते. मात्र आता चोरट्यांनीही डब्यांवर डोळा ठेवला आहे. मुंबईच्या मालाड (पूर्व) येथील खांडवाला लेन परिसरात घडलेल्या एका विचित्र घटनेने डबेवाले वर्गात खळबळ उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेमिनाथ इमारतीत दिनेश वायकर नावाचा डबेवाल्याने आपली सायकल गेटबाहेर उभी केली होती. त्या सायकलवर अकरा डबे लटकवलेले होते. डबे देऊन तो खाली आला, तर सायकल जागेवरून गायब झाली. वायकर यांनी आजूबाजूला चौकशी केली असता कोणालाही काही याबाबत माहिती नसल्यामुळे ते देखील गोंधळून गेले. मात्र आपली सायकल चोरी गेली असल्याचा संशय आल्याने डबेवाल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून चोरीचा तपास सुरू केला आहे.

डबेवालाच्या सायकल चोरीच्य घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. 'डबेवालेही सुरक्षित नाहीत का आता?' मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना डबेवाल्यांची सायकलही चोरट्यांच्या निशाण्यावर आली आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.

परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईतील परदेशी नागरिकांना कर्ज देण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्जीय टोळीचा पर्दाफाश मुलुंड पोलिसांनी केलाय. मुलुंडमधील कॉलनी परिसरात हे रॅकेट कार्यरत होतं. आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करत ही टोळी त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेसच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा मधील नागरिकांना संपर्क साधायचे. त्यानंतर त्यांना त्वरित कर्ज मिळवून देण्यासाठी प्रोसेसिंग फी आकारली जायची, ही प्रोसेसिंग फी नामांकित स्टोअर्सच्या गिफ्ट व्हाउचर्सच्या माध्यमातून आकारली जायची.

ज्यावेळी एखादा नागरिक यांच्या जाळ्यात यायचा त्यावेळी त्याच्याकडून मिळालेले गिफ्ट व्हाउचर हे सुरतमधील हे रॅकेट चालविणाऱ्या प्रशांत राजपूत याला दिले जायचं. एका विश्वसनीय सूत्राच्या माहितीच्या आधारावर मुलुंड पोलिसांनी कॉलनी परिसरात असलेल्या या कॉल सेंटरवर धाड मारली. सागर गुप्ता सह अभिषेक सिंह, तनय धडसिंग, शैलेश शेट्टी आणि रोहन अन्सारी यांना अटक करण्यात आली असून, सुरतचा प्रशांत राजपूत या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकत्र, कारण काय? VIDEO व्हायरल

Chai Masala: रोजचा चहा अजून फक्क्ड होणार, 'हा' घरगुती मसाला टाकून पाहा

Maharashtra Live News Update: भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने महाआरती

Alphonso Mango: हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणातील शेतकरी कोर्टात जाण्याच्या तयारीत

पुण्यात मोठा राजकीय भूकंप! भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT