Mumbai Cyber Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Cyber News : १ कोटी २७ लाखांना मुंबईतील घर विकलं, महिलेचा मेसेज आला अन् सगळंच गमावून बसला

Mumbai Cyber Crime : पार्ट टाइम जॉब आणि जबरदस्त परताव्याच्या आमिषाला एक व्यक्ती बळी पडली आहे. कशी झाली फसवणूक वाचा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Cyber Crime News : मुंबईतील एका ५३ वर्षीय व्यक्तीला आयुष्यभराची कमाई गमवावी लागली आहे. पीडित व्यक्तीने मुंबईतील घर विकलं. त्यापोटी त्याला १ कोटी २७ लाख रुपये मिळाले. पण ही व्यक्ती सायबर चोरांच्या जाळ्यात अडकली आणि घर विकून मिळालेले कोट्यवधी रुपये क्षणात गमावले.

मिळालेल्या माहितीनुसार , मध्य मुंबईत राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने गुंतवणूक म्हणून नवीन फ्लॅट घेण्यासाठी आपलं स्वतःचं घर १.२७ लाख रुपये किंमतीला विकलं. दुर्दैवानं त्याचवेळी या व्यक्तीची गाठ सोशल मीडियावर एका महिलेशी पडली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार, ९ फेब्रुवारीला एका महिलेने त्यांना सोशल मीडियावर मेसेज पाठवला. पार्ट टाइम नोकरी आणि त्यातून मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवलं. महिलेने हॉटेल आणि मूव्हीची तिकीटे शेअर करतो. रेटिंग द्याल म्हणून सांगितलं. तसेच त्याचे स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवण्यासही सांगितले.  (Mumbai News)

सुरुवातीला ७ हजार दिले अन् नंतर...

त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला हॉटेलला रेटिंग दिल्याने त्यांना ७ हजार रुपये दिले. पण त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आली. ७ हजारांच्या बदल्यात १ कोटी २७ लाख रुपये गमवावे लागले. दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यातून ही सर्व रक्कम सायबर चोरांच्या बँक खात्यात जमा झाली. (Crime News)

'त्या' महिलेने काय केले?

संबंधित व्यक्तीने पार्ट टाइम जॉब करण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर समोरील महिलेने एक वेब लिंक पाठवली. नंतर बँक खाते क्रमांक सर्व तपशीलासह मागितले. तिने त्याला लॉग-इन आणि पासवर्ड दिलं. तसेच दहा हजार रुपये त्यात जमा करण्यास सांगितले. हॉटेल इंडस्ट्रीसंदर्भातील महितीची लिंक तिने संबंधित व्यक्तीला पाठवली. त्यानुसार त्याने रेटिंग दिली. त्याचा स्क्रीनशॉट तिला पाठवला. त्यानंतर त्याच्या खात्यात १७३७२ रुपये पाठवण्यात आले. मात्र, पुढच्या वेळी तिने मुव्हीला रेटिंग देण्यासाठी एक लिंक पाठवली. तसेच ३२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानेही ते डिपॉझिट केले. ई वॉलेटमध्ये जाऊन तुम्ही किती कमावले हे बघा म्हणून सांगितले. त्यावर त्यांच्या खात्यात ५५ हजार जमा झाल्याचे दिसले. त्याने ते ५० हजार तिच्या खात्यात पाठवले. मात्र, लिंकमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून पुन्हा रक्कम पाठवायला सांगितली. त्यानुसार त्याने पुन्हा ५५ हजार पाठवले.

या महिलेने बँक खाते क्रमांक दिले होते, त्यामध्ये त्याने १७ मे रोजी ४८ लाख रुपये जमा केले. ४८ लाखांचे ६० लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवले. त्याप्रमाणे ई वॉलेटमध्ये ६० लाख रुपये जमा झाल्याचेही दिसले. त्यावर ६० लाख रुपये हवे असतील तर आणखी ३० लाख रुपये जमा करावे लागतील. असे तिने सांगितले. १८ मे रोजी पीडित व्यक्तीने विविध ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून एकूण ७६ लाख रुपये त्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले.

सर्व मूव्ही, हॉटेल्सना लिंकद्वारे रेटिंग दिल्यानंतरही महिलेने पैसे परत केले नाहीत. यावर त्याने महिलेला विचारणा केली. पण आणखी पैसे पाठवा असे तिने सांगितले. शेवटी हतबल झालेल्या व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या बँकेच्या ८ खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. फेब्रुवारी ते मे दरम्यान ही फसवणूक झाल्याचे उघड झाले. आरोपींची ही सर्व आठ बँक खाती गोठली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी केलं सावध

या घटनेनंतर पोलिसांनी सर्वसामान्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. आपल्यावर विश्वास ठेवावा आणि बोगस स्कीम खरी वाटावी यासाठी सायबर चोर सुरुवातीला लोकांना काही मोजकी रक्कम परतावा म्हणून देतात. लोकांना लालूच दिल्यानंतर त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून मोठी रक्कम घेतात. लोकांनी रक्कम गुंतवली की मोठा डल्ला मारून हे सायबर चोर गायब होतात, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT