Surabhi Jayashree Jagdish
पाणीपुरीच्या तिखट पाण्यासाठी सुका मसाला तुम्ही घरच्या घरी सहज आणि झटपट बनवू शकता. हा मसाला तयार करून ठेवल्यास लागेल तेव्हा फक्त पाण्यात मिसळून पाणी तयार करता येते.
सुखे पुदिना, जिरे, काळी मिरी, काळं मीठ, चाट मसाला, सुंठ पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ, हिंग
एका कढईत जिरे आणि काळी मिरी मंद आचेवर हलके भाजून घ्या. त्यांचा सुगंध येईपर्यंत भाजा, पण ते करपणार नाहीत याची काळजी घ्या. भाजलेले जिरे आणि काळी मिरी एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर, भाजलेले जिरे आणि काळी मिरी मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात सुका पुदिना, काळं मीठ, चाट मसाला, सुंठ पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ आणि हिंग घाला. हे सर्व मिश्रण एकदम बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्या.
तयार झालेला मसाला एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा मसाला तुम्ही साधारण ३ ते ४ महिने वापरू शकता
एका मोठ्या भांड्यात १ लीटर थंड पाणी घ्या. त्यात तयार केलेला सुका मसाला २ ते ३ मोठे चमचे (चवीनुसार कमी-जास्त) घाला.
त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घाला.चव घेऊन मीठ किंवा तिखट कमी वाटल्यास अजून थोडं घाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.