Mumbai CSMT Saam Tv
मुंबई/पुणे

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

Mumbai CSMT Food Stall : मुंबईतील सीएसटी परिसरातील प्रसिद्ध फूड स्टॉल्स बीएमसीच्या ३३.६६ कोटींच्या टाऊन हॉल प्रकल्पासाठी स्थलांतरित होणार आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या स्टॉल्सवर भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

  • बीएमसीच्या ३३.६६ कोटींच्या टाऊन हॉल प्रकल्पासाठी सीएसटी फूड स्टॉल्स स्थलांतरित होणार.

  • नोकरदार वर्गासाठी चिंतेचा विषय

  • पिढ्यानपिढ्या चाललेले व्यवसाय अचानक धोक्यात आल्याने स्टॉलधारकांची चिंता.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शहराच्या मध्यवर्ती भागात नव्या टाऊन हॉलच्या बांधकामाचा मोठा प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी ८० वर्षे जुने क्रीडा संकुल जमीनदोस्त करून नव्या आधुनिक वास्तूला आकार दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल ३३.६६ कोटी रुपये असून, तो पूर्ण झाल्यानंतर मुंबईला एशियाटिक लायब्ररीनंतर दुसरा ऐतिहासिक टाऊन हॉल मिळणार आहे. मात्र या कामामुळे वर्षानुवर्षे सीएसटी परिसरात चालत आलेल्या फूड स्टॉल्सना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागणार आहे.

कॅनन पावभाजीच्या शेजारी आणि सीएसटी सबवेच्या एक्झिटच्या समोर असलेले हे स्टॉल्स मुंबईकरांसह पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले होते. दिवस सुरु झाल्यापासून ते रात्र होईपर्यंत कामगार वर्ग, ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी आणि परदेशी पर्यटक यांची रेलचेल दिसत असे. विशेष म्हणजे काही स्टॉल्सचा वारसा तीन-तीन पिढ्यांनी जपला आहे. त्यामुळे अचानक मिळालेल्या स्थलांतराच्या नोटिसेमुळे स्टॉलधारकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या महिन्यात बीएमसीने या सर्व स्टॉलधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये परवाना कागदपत्रे, व्यवसायाची नोंदणी आणि इतर पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी या घडामोडीला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "प्रस्तावित टाऊन हॉलच्या बांधकामादरम्यान आम्ही हे स्टॉल तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. एकतर पर्यायी जागा मिळेल किंवा बांधकाम पूर्ण होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा लागेल,” असे ते म्हणाले.

याबाबतीत व्यथा मांडत स्टॉलधारक म्हणाले, "आम्ही गेल्या २-३ पिढ्यांपासून व्यवसाय करत आहोत. जर स्टॉल्स स्थलांतरित केले तर आमचा उदरनिर्वाह जाईल. पर्यटकांनाही येथे परवडणारे अन्न मिळणार नाही," असे एका स्टॉल मालकाने सांगितले. दुसऱ्याने पुढे म्हटले, "हे ठिकाण स्वस्त आणि परवडणारे जेवण म्हणून ओळखले जाते. आम्हाला हलवल्याने केवळ आमचेच नाही तर कामगार वर्गाचेही नुकसान होईल.

या फूड स्टॉल्सची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सीएसटी, आझाद मैदान आणि नव्या मेट्रो ३ स्थानकाच्या अगदी समोर आहेत. त्यामुळे येथे दररोज हजारो लोकांचा ओघ असतो. एकदा हे स्टॉल्स हलवल्यानंतर त्या परिसराचे स्वरूपच बदलून जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, जुने क्रीडा संकुल जे आतापर्यंत बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होते, ते महालक्ष्मी रेसकोर्सजवळील नव्या आधुनिक क्रीडा संकुलात स्थलांतरित केले जाणार आहे. तेथे कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील. प्रस्तावित टाऊन हॉल मात्र वेगळ्या स्वरूपात उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला आधुनिकता आणि वारसा यांचा संगम साधणारे नवे केंद्र मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT