Bhandara Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

Mumbai Dadar Crime News : मुंबईतील दादर परिसरात एका महिलेचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी एडीआरची नोंद करून प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

  • रात्री उशिरा पोलिसांना घटनेची माहिती

  • सायन रुग्णालयात मृत घोषित

  • शिवाजी पार्क पोलिसांकडून एडीआर नोंद, तपास सुरू

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने २७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास इमारतीच्या ७व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. मानसिक नैराश्येतून या महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचे म्हटलं जात आहे. मृत महिलेचे नाव कमला केशव अग्निहोत्री असे आहे. त्या केळुस्कर रोडवरील प्रभात ७२ इमारतीत राहत होत्या. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, पोलिसांना रात्री १२.३० वाजता केळुस्कर रोडवरील प्रभात ७२ इमारतीसमोरील फूटपाथवर एक बेशुद्ध महिला पडल्याचा फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला ताबडतोब सायन रुग्णालयात हलवले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्राथमिक चौकशीदरम्यान, इमारतीचे सुरक्षा रक्षक वरुण सिंग यांनी पोलिसांना माहिती दिली की, मृत महिला राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडली होती आणि ती फ्लॅट क्रमांक ७०१ मधील रहिवासी होती. पोलिसांनी पीडितेचा पती केशव अग्निहोत्री यांनाही या घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी तपासणी करताना, अधिकाऱ्यांना आढळून आले की बेडरूमच्या बाल्कनीच्या सेफ्टी ग्रिलचा एक भाग एका बाजूने वेगळा आढळला होता, ज्यामुळे महिलेने तिथून उडी मारली होती हे दिसून आले. मृत महिलेच्या पतीने चौकशी दरम्यान महिला नैराश्येत असल्याचं म्हटलं आणि त्यातूनच आत्महत्या केली असल्याचं पोलिसांना सांगितलं. शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) अंतर्गत अपघाती मृत्यू (एडीआर) चा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Baramati Places: पुण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामतीतील या 5 प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट

UGC Rule: यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला झटका

SCROLL FOR NEXT