Kirti Vyas Case 
मुंबई/पुणे

Kirti Vyas Case: कीर्ती व्यास हत्या प्रकरणात दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. न्यायालयानं तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंधेरीतील बीब्लंट सलूनमध्ये हे तिघेही काम करत होते. कीर्तीच्या हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.

कीर्ती व्यास हत्या प्रकरण

मुंबईतील एका प्रसिद्ध सलून ब्रँडमध्ये किर्ती व्यास मॅनेजर पदावर काम करत होती. आरोपी सिद्धेश आणि खुशीही तिथेच काम करत होते. खराब परफॉमन्सबद्दल मॅनेजर किर्तीनं सिद्धेशला एका महिन्याची नोटीस दिली होती. याचा राग मनात धरून सिद्धेशनं खुशीच्या मदतीनं चालत्या गाडीत किर्तीची हत्या केली होती. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात सिद्धेश किर्तीच्या घराजवळ दिसून आला होता, त्यानंतर या हत्येचं बिंग फुटलं. मात्र शोध घेऊनही वडाळा खाडीत टाकलेला किर्तीचा मृतदेह सापडलाच नाहीये.

किर्ती व्यास १६ मार्च २०१८ रोजी दक्षिण मुंबईतील तिच्या राहत्या घरातून कामावर गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. बेपत्ता होऊन दोन महिने झाल्यानंतरही कीर्तीचा तपास लागला नव्हता. या दोन महिन्यांनंतर पोलिसांनी तिच्या दोन सहकाऱ्यांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. कीर्तीचा मृतदेह कधीही सापडला नाही, पण फिर्यादीने दावा केला होता की कामाच्या ठिकाणी तिच्या सहकाऱ्यांशी वाद झाला होता.

त्यातून काहीतरी घातपात झाला होता. मात्र सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी यांनी सुरुवातीला याबाबत नकार दिला होता. मात्र पुराव्यांवरुन पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. आज याप्रकरणाच निकाल लागला असून मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी किर्तीच्या हत्येचा कट रचला होता. सिद्धेश आणि खुशी हे दोघे मिळून कारने कीर्तीच्या घरी गेले आणि तिला घरातून सोबत घेतले. ठरल्याप्रमाणे त्यांनी किर्तीला कारमध्ये बसवलं. त्यानंतर सिद्धेशने कीर्तीला नोटीस परत घेण्यास सांगितले. पण किर्तीनं त्याला नकार दिला. यानंतर सिद्धेशने कीर्तीची हत्या केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT