Pune Cybercrime News Saam TV
मुंबई/पुणे

Andheri Crime News: सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; व्यवसायिकाला लाखोंचा गंडा, अंधेरी पोलिसांकडून दोघांना अटक

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Andheri News: मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान असते मात्र मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी अशा दोन सायबर गुन्हेगारांना मध्यप्रदेश येथील कटरा भागातून अटक केली आहे. (Latest Marathi News)

या दोघांनी फिर्यादींना माल पुरवठा करणाऱ्या कंपनीचा ईमेल आयडी आणि बँक अकाउंट नंबर बदलला असून खात्यात रोख रक्कम मागून फिर्यादींची फसवणूक केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन सायबर गुन्हेगारांना बम्हणी बंजर, कटरा हा नक्षलग्रस्त प्रभावित भागातून अटक केली.

निरज राजेंद्र राठोर, धर्मेंद्र सुदर्शन पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अंधेरी पोलिसांनी गुन्ह्यात फसवणूक झालेली एकुण ७,४३,०९६/- रूपये इतकी रक्कम गोठवली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ती फिर्यादींना परत दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्यादी यांच्या मेल आयडीवर त्यांना माल पुरवठा करणाऱ्या गांधी कंपनीच्या info@gandhichemicals.com या ईमेलवरून कंपनीचे बँक खात्यात बदल झाला असून निरज राठौर यांच्या खात्यात ऑनलाईन ८,३०,५२१/- रूपये पाठविण्यास सांगितले.

फिर्यादींनी विश्वास ठेवून सांगितलेली रक्कम मिरज यांच्या खात्यात पाठवून दिले. मात्र आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीनुसार कलम ४१९, ४२० भा.दं.वि सह कलम ६६ (क(, ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास वपोनि संताजी घोरपडे, पो. नि. गुन्हे बालाजी दहिफळे, मपोनि गुंडरे (सायबर अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तोडकर (सायबर अधिकारी), पो.ह. सुर्यवंशी पो.ह.चव्हाण, पो.ह.भोसले, पोशि नरबट, मपोशि गोम्स, लबडे व पोशि सुदीप शिंदे तांत्रिक मदत पो.ह. पिसाळ या पथकाने बालाघाट तसेच मंडला या नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये जावून गुन्ह्यातील दोन्हीही आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.

दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता तपासा दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT